उदयनराजे आणि त्यांचे कुटुंबीय हे माझे आदर्श – गिरीश बापट

सातारा | भाजपचे जेष्ठ नेते खासदार गिरीश बापट हे आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात आज त्यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृहात भाजपच्या कार्यकर्त्याची बैठक घेतली. यावेळी त्यांनी खा.उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. ते म्हणाले छत्रपती उदयन महाराज आणि त्यांचे कुटुंबीय हे माझे आदर्श आहेत…ज्या ज्या वेळेस मी मंत्री, आमदार, खासदार झालो त्यावेळेस मी या कुटुंबियांची भेट घेतली आहे यावेळेस कोरोनामुळे खासदार झाल्यावर माझी भेट झाली नव्हती यामुळे आज सदिच्छा भेट घेतली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप प्रभावीपणे उतरली आहे. बहुतांश ठिकाणी आमचे कार्यकर्ते, सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. आम्ही सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानत नसल्याचे देखील त्यांनी नमूद केले. आमदार रोहित पवार यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना पैसे देत आहेत, तसे भाजपकडून काय दिले जाणार आहे, या प्रश्नावर श्री. बापट यांनी राष्ट्रवादीकडे पैसा आहे. त्यामुळे ते पैसा देऊन स्वागत करतात. आम्ही बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आहे. अस उत्तर दिले.

यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा कपातीच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले सगळ्यांना सुरक्षितता देणे हे राज्य सरकार चे काम आहे…मात्र राज्य सरकार ने घेतलेला हा निर्णय राजकीय आकसापोटी आहे हे पहावे लागणार आहे पण देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील संरक्षणाची गरज नसल्याचे आणि आमचा कार्यकर्तेच आमचे कवच आहेत अशी बोचरी टीका भाजप नेते खा. गिरीश बापट यांनी केलीय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like