मागण्या मान्य न झाल्यास उद्रेक निश्चित : उदयनराजे भोसलेंचा सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

मराठा आरक्षण प्रश्नी आक्रमक झालेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून काल  कोल्हापुरात मराठा मूक मोर्चा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले. यानंतर त्यांनी गुरुवारी राज्य सरकारला इशाराही दिला आहे. “5 जुलै पर्यन्त सरकारने मागण्या पुर्ण करण्याचा विनंती केली आहे. मागण्या जर पूर्ण न केल्यास उद्रेक निश्चित आहे. आणि उद्रेक झाल्यास याला सर्वस्वीपणे राज्यसरकार जबाबदार असेल,” असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे गुरुवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारण टीकास्त्र सोडले. यावेळी ते म्हणाले, दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा प्रश्न हा चिघळतोय.  गांभीर्याने राज्य सरकारने याकडे बघायला हवे होते पण तसे पहायला मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्ट, जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे झटकणे हे योग्य नाही. मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींची आरक्षण मिळवुन देणे हि जबाबदारी बनली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारला विनंती केलीय. या पत्रात आम्ही सारथी संस्थेला 1 हजार कोटी देण्यात यावेत, आण्णासाहेब पाटील महामंडळास 2 हजार कोटीची तरतुद करण्यात यावी, प्रत्येक जिल्हयात मराठा समाजातील युवकांसाठी वस्तीगृह बांधण्यात यावेत, राजर्षी शाहु महाराजांची योजना पुन्हा लागु करावी, आदी मागण्या केल्या आहेत.

मुख्यमंत्र्याना दिलेल्या पत्रातील विषयाबाबत या अगोदरसुद्धा चर्चा केलेली आहे. मात्र, सरकारकडून अजुन यावर तोडगा निघालेला नाही. याला जबाबदार आमदार आणि खासदार आहेत. राजकारण सर्वांनी करावे पण मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सर्व पक्ष घेतात पण त्यांचे विचार अंमलात आणत नाहीत. असे जर चालत राहिले तर देशाचे तुकडे होतील. सर्व राज्यकर्त्यांना हात जोडुन विनंती करत आहोत कि मराठा समाजाच्या  भावना समजुन घ्या, त्यांचा उद्रेक झाला तर याला राज्यकर्ते जबाबदार असतील. आरक्षणाबाबत कोणीतरी खोडसाळपणा करत आहे. हे समजुन घ्यायच असेल तर अधिवेशन बोलवण्याची गरज आहे आणि याचे थेटप्रक्षेपण महाराष्ट्रात व्हावे. वारंवार मागणी करुन ही अधिवेशन बोलावले जात नाही, श्वेतपत्रिका अजुन तयार नाही यामुळे कुठे तरी पाणी मुरतय हे नक्की. मागण्या मान्य न झाल्यास जे काही परिणाम होतील त्याला राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

Leave a Comment