उदयनराजेंच्या पॅलेसमधून चांदीच्या बंदुकीची चोरी ; दिड किलो वजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी | सातारा

सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर पॅलेस येथून आज एका कामगाराने शोभेच्या चांदीच्या बंदूकीची चोरी केली ती बंदूक साताऱ्यातील एका सोने-चांदीच्या व्यवसायाकडे विक्रीसाठी जात असताना सातारा शहर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संजू गुसिंगे यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यासंशयित चोरट्याची झडती घेतली असता त्याच्याकडे साधारण दोन फूट लांब ,अंदाजे दीड किलो वजन असलेली चांदीची बंदूक आढळून आली.संशयित इसमाकडे अधिक चौकशी केली असता त्याने ही बंदूक खा.उदयनराजेंच्या जलमंदीर पॅलेस येथून चोरल्याची कबूली पोलिसांना दिली.या संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदयनराजे भोसले यांच्या जलमंदीर पॅलेस येथे नेहमीच कार्यर्कत्यांची वर्दळ असते.याठिकाणी राज्याभरातून उदयनराजेंना भेटण्यासाठी समर्थक येत असतात. येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जाते. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस याठिकाणी माळी कामासाठी आलेल्या कामगारांने ही चोरी केल्याची बाब समोर आली. या बंदुकीची अंदाजे किंमत लाखभर रुपये असल्याचे बोलले जात आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर म्हणाले की आरोपीची सखोल चौकशी केली असता सदर आरोपीने ही चांदीची रायफल साताऱ्यातील जलमंदिर येथून चोरली आहे. आरोपीवर कलम 380 द्वारे शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर रायफलची किंमत 1 लाख 4 हजार असून वजन दीड किलो आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment