उदयनराजे शंभूराज देसाईंच्या घरी; भेटीमागचे ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात उदयनराजेंनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या.

दरम्यान, आजच्या भेटीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय खलबते रंगली. उदनयराजे आणि शंभूराज देसाई यांची ही काही पहिलीच भेट नाही. यापूर्वी अनेकवेळा दोन्ही नेते एकमेकांना भेटले आहेत. उदयनराजे आणि शंभूराज देसाई हे वर्गमित्र आहेत. यापूर्वीच्या भेटीत शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली होती.

शंभुराज देसाई यांचे घराण्याचे घनिष्ठ संबंध आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत दोन दिवसात महत्वाच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे ते म्हणालेत. 8 मार्चपासून मराठा आरक्षण सुनावणी आहे. मराठा आरक्षणाबाबत कोणीही राजकारण करु नये. त्यादरम्यान अधिवेशन होत असल्यामुळे या विषयी चर्चा झाली. सातारा शहरात लष्कर प्रशिक्षण केंद्र आणण्याबाबत शंभुराज देसाईंसोबत चर्चा झाली.

”मराठा आरक्षणाबाबत लीड कायम मी घेतलंय पण आता ते गळाला आलंय. वकील सर्वच हुशार आहेत, परंतु जी आत्मियता लागते अशा वकिलांची नेमणूक करा. मी कोणाच्या विरोधात नाही पण यामध्ये विसंगती दिसून येते. जिल्हा बँकेची निवडणुक लागलीये याप्रश्नावर फलटणचे राजे,आमचे सातारचे राजे,लोकशाहीचे राजे कसली आखणी करताहेत हे काळ आणि वेळ सांगेल,” असं उदयनराजे म्हणाले.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

Leave a Comment