माझ्या डोळ्यांतून पाणी आलं; उदयनराजेंनी लावला योगी आदित्यनाथांना फोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी आग्र्यातील निर्माणाधिन मुघल संग्रहालायचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय ठेवण्याची घोषणा केली आहे. मुघलांची ओळख आम्हाला नकोय आणि आम्हाला आमच्या संस्कृतीवर गौरव आहे, असं योगींनी म्हटलं होत. याबाबत आज भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी योगी आदित्यनाथ यांना फोन करुन त्यांचे आभार मानले. यावेळी तुमचा निर्णय एकताच माझ्या डोळ्यांतून पाणी आल्याचं भोसले यांनी सांगतले.

मी तुमचे आभार शब्दात व्यक्तच करू शकत नाही असं म्हणत उदयनराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच मी स्वतः तुमचे आभार मानायला तुम्हाला भेटणार आहे, असंही उदयनराजे म्हणाले. यावेळी माझ्या डोळ्यांतून पाणी आलं असं म्हणत उदयनराजेंनी आपल्याला तुमच्या निर्णयामुळे गहीवरुन आल्याचं सांगितले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3251042105013194&id=1506067669510655&_rdr

तुम्ही जे केलं ते पाहून माझ्या डोळ्यातून पाणी आलं. खरंच मी तुमचा मनापासून आभारी आहे”. तसेच कोरोना काळात तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या असेही उदयनराजे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment