….तर मी खासदारकीचा राजीनामा देणार ; उदयनराजेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण सरकारने दिलं तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि राजीनामा देऊन टाकणार असा इशारा उदयनराजे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिला आहे.

उदयनराजे म्हणाले,”माझी बांधिलकी लोकांशी आहे, पक्षाशी नाही.मी काही राजकारणी नाही. राजकारण करणं आपल्याला पटत नाही.जे माज्या मनाला पटत तेच मी करतो आणि जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी कधीच करत नाही.

प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. सर्वांना न्याय मिळत आहे मग मराठा समाजानेच का वंचित रहावं? मराठा समाजाला न्याय नाही मिळाला तर उद्रेक होणारच. पण जर तो झाला तर मग त्याला जबाबदार कोण?,” अशी विचारणा उदयनराजेंनी केली आहे. अन्याय जिथे होत असेल तिथे मी उतरणार असल्याचं म्हणत उदयनराजेंनी मराठा आरक्षणावरून आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like