तुमचं हिंदुत्व हे “दलालांचं हिंदूत्व” ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परखड मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये प्रसिद्ध होणार आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा दुसरा प्रोमो खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. पहिल्या प्रोमोप्रमाणेच दुसऱ्या प्रोमोमध्येही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक रुपात दिसत आहेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या ठाकरे शैलीत भाजपवर निशाणा साधला.

तुमचं हिंदुत्व हे “दलालांचं हिंदूत्व” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलित विरोधकांना ठणकावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दूसरा प्रोमो आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रोमोत शुद्ध भगवा, हिंदूत्त्व, वीज बील, भ्रष्टाचारांचे आरोप आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी झालेल्या राजकारणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक उत्तरं दिली आहेत.

पहिल्या प्रोमो मध्ये काय म्हणाले उद्धव ठाकरे-

हात धुवा सांगण्यापलिकडे मुख्यमंत्र्यांनी काय केलं असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी विचारला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता अगदी जबरदस्त शैलीत भाजपवर निशाणा साधला आहे. हात धुवा हे सांगण्याव्यतिरीक्तही मी हात धुवून मागे लागू शकतो असा सूचक इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला आहे.तसेच जे आडवे येतील त्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like