दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; राज्यासहित देशाच्या राजकारणावर करणार भाष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा असून कोरोना प्रादुर्भाव पाहता यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क वर न घेता षण्मुखानंद हॉलमध्ये घेण्याचं ठरलं आहे. उद्याच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून ते देशाच्या, राज्याच्या राजकीय घडामोडींवर बोलतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली

शिवसेनेचा दसरा मेळावा ऐतिहासिक असतो.आमची मुलुखमैदानी तोफ उद्या धडाडणार आहे. कोरोनाचा नियमांचा भंग हाऊ नये म्हणून यंदा दसरा मेळावा षणमुखानंद हॉलमध्ये होत असून उद्धव ठाकरे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर बोलतील” असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वर टीका केली. चंद्रकांत पाटील यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने महाराष्ट्राला काहीही फरक पडत नाही. तोंडाच्या वाफा दडवणे हे त्यांचं कामच आहे असा टोला संजय राऊतांनी लगावला.

You might also like