एकनाथ शिंदेंच्या बंडावर मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षा विरोधात बंड पुकारल असून महाविकास आघाडी सरकार अडचणीत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असून ठाकरे सरकारही धोक्यात येऊ शकते. या एकूण घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना शिवसैनिकांना धीर दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे ते माझे ऐकतील. कुठेही घाबरण्याचे कारण नाही. त्यामुळे कोणीही चिंता करू नये. भाजपसोबत आपल्याला काय कमी त्रास झाला आहे का? मग आता परत कशाला त्यांच्या सोबत जायचं? सध्या आपण महाविकासआघाडी सोबत आहोत. दोन्ही पक्ष आपल्या सोबत आहेत अस उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 45 आमदार असल्याचा दावा केला आहे. तसेच सर्व आमदारांना गुवाहाटी ला हलवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे लवकरच नवा गट स्थापन करून भाजपला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यात लवकरच राजकीय उलथापालथ पाहायला मिळू शकते.

Leave a Comment