उद्धव ठाकरेंमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातुन उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यात येत आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे असं ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना भरभरून शुभेच्छा दिल्या.

अखंड साथ. अतूट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे.. तो दिवस लवकरच उगवेल..
आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

दरम्यान, राष्ट्रालाही उद्धव ठाकरेंसारख्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. उद्धव ठाकरे एक दिवस देशाला नेतृत्व देतील अशा शुभेच्छा मी त्यांना देतो असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे असे राऊत म्हणाले.

You might also like