हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. उध्दव ठाकरे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा आहेत.
अत्यंत महत्त्वाच्या अशा या भेटीच्या आधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांची प्रदीर्घ चर्चा झाली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीच्या चर्चेला दुजोरा दिला. मराठा आरक्षणासोबत राज्याशी संबंधित अन्य मुद्द्यांवरही पवार व ठाकरे यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधानांच्या भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांचा समावेश असेल, असं एकनाथ शिंदे यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
CM Uddhav Thackeray met Sharad Pawar to discuss issues including Maratha reservation ahead of meeting with PM Modi. Delegation of Maharashtra CM, Dy CM Ajit Pawar & Maratha reservation Sub-committee head Ashok Chavan will meet the PM on June 8:Maharashtra Min Eknath Shinde(07.06) pic.twitter.com/Ciecxg4t2P
— ANI (@ANI) June 7, 2021
दरम्यान मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झालं असल तरी उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यातील भेटीनंतर नक्कीच यावर तोडगा निघेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर गंभीरपणे विचार करत आहेत. मराठा आरक्षणावर काळजीपूर्वक काम करत आहेत. असे संजय राऊत यांनी म्हंटल.