बाबरी मशिद पाडली तेव्हा सर्व ‘येर गबाळे’ पळून गेले मात्र एकटे बाळासाहेब उभे राहिले

मुंबई | भाजपनं आम्हाला कधीच हिंदुत्व शिकवू नये कारण तेवढी तुमची पात्रता नाही. ज्या बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही करत आहात. त्याचं हिंदुत्व हे कधीच शेंडी आणि जानव्याचं किंवा सोवळ्या – ओवळ्याच हिंदुत्व नव्हतं, अशा दमदार शब्दात राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला उत्तर दिले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल बोलताना आपल्या भाषणाच्या शेवटी “तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! येर गबाळ्याचे काय काम!!” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशीद प्रकरणाची भाजपला आठवण करुन दिली आहे. ठाकरे म्हणाले की “ज्यावेळी बाबरी मशिदी पाडली गेली तेव्हा सर्व ‘येर गबाळे’ पळून गेले होते. एकटे बाळासाहेब आक्रमकपणे उभे राहिले होते. त्यामुळे भाजपनं हिंदुत्वाच्या गप्पा मारू नये.

या हिंदुत्ववादी भाजपवाल्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पींडीपी सोबत युती केली होती.ही अशी अभद्र युती करताना भाजपचं हिंदुत्व कुठं गेलं होतं?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांनी आज खास आपल्या ठाकरी शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.प्रत्येक आरोप – प्रत्यारोपांच्या त्यांनी चांगलाच समाचार घेत.एक – एक मुद्द्याला चांगलेच खोडून काढत उत्तर दिले.

You might also like