Wednesday, October 5, 2022

Buy now

ENG VS NZ : इंग्लंड-न्यूझीलंड कसोटीदरम्यान दोन फॅन्समध्ये जोरदार हाणामारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. 1 ते 5 जुलै या दरम्यान भारत-इंग्लंड कसोटी सामना रंगणार आहे. पण त्याअगोदर सध्या इंग्लंडचा संघ मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध (ENG VS NZ) कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत इंग्लंडने (ENG VS NZ) 3-0 ने विजय मिळवत मालिका जिंकली आहे. मात्र आजच्या सामन्यात इंग्लंडच्या मालिका विजयापेक्षा दुसऱ्याच कारणामुळे हि मालिका चर्चेत राहिली.

काय घडले नेमके ?
इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड (ENG VS NZ) यांच्यातील क्रिकेट सामना सुरू असताना एक विचित्र गोष्ट घडली आहे. क्रिकेट सामन्यात एखादा निर्णय पटला नसल्यावर मैदानात पंच किंवा खेळाडूंमध्ये राडा झाल्याचे अनेक किस्से आपण पाहिले आहेत. पण या सामन्या दरम्यान थेट प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दोन तरूणांमध्येच तुफान राडा झाला आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या मालिकेत इंग्लंडने (ENG VS NZ) 3-0 ने विजय मिळवत मालिका जिंकली आहे. लीड्समधील हेडिंग्लेच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येत होता. या मालिका विजयामुळे इग्लंडने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी झेप घेतली आहे.

हे पण वाचा :
शिवसैनिक आक्रमक!! श्रीकांत शिंदे यांचे कार्यालय फोडले

आम्ही शिवसेनेचेच सदस्य, काँग्रेस- राष्ट्रवादीनेच सेनेला हायजॅक केलं

हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा; मुख्यमंत्र्यांचा शिंदेवर हल्लाबोल

साताऱ्यात आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात आंदोलन

मुंबईत 10 जुलै पर्यंत जमावबंदी लागू