उज्ज्वला योजने अंतर्गत गॅसधारकांना अजून मिळणार फायदा! जाणून घ्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये एक कोटी नवीन गॅस कनेक्शन देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत भारत सरकार नागरिकांसाठी खास योजना आणत आहे. उज्वला योजनेमध्ये ही नवीन गॅस जोडणी देण्यात येणार आहे. त्यासोबतच उज्वला योजनेचा विस्तारही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एलपीजी कनेक्शन या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे.

उज्वला योजना अंतर्गत शासन गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करते. या योजने अंतर्गत शासनाने गरीब कुटुंबांना 1600 रुपये देण्याचे ठरवले आहे. नवीन एलपीजी गॅस कनेक्शन खरेदी केल्यावर हे पैसे मिळतील. यासोबतच आता गॅस स्टोव्ह आणि नवीन सिलेंडर घेतल्यानंतर EMI ची सुविधाही देण्यात आली आहे.

उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी कोणतीही BPL महिला अर्ज करू शकते. यासाठी योजनेचा KYC फॉर्म भरून गॅस सेंटरमध्ये जमा करावा लागणार आहे. अर्ज करताना आपल्याला 14.2 किलोग्रॅम आणि 5 किलोग्रामचे सिलेंडर हे दोन पर्याय समोर असतील. या योजनेला अर्ज करण्याआधी महिला BPL मधील असावी, 18 वर्ष वय पूर्ण असणे गरजेचे, बँकेत खाते असणे गरजेचे, अर्जदाराच्या नावावर आधी गॅस कनेक्शन नसावे.

Leave a Comment