ब्रिटनच्या कोर्टाकडून एअर इंडियाला दिलासा, काय आहे संपूर्ण प्रकरण हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सरकारी एअरलाइन्स एअर इंडियाला ब्रिटनच्या कोर्टाने एका प्रकरणात दिलासा दिलेला आहे. ज्यामध्ये ब्रिटनच्या कोर्टाने एअर इंडियाला 17.6 मिलियन डॉलरच्या पेमेंटच्या थकबाकीसाठी जानेवारी 2021 पर्यंत चा वेळ दिलेला आहे. एअर इंडिया ने चायना एअरक्राफ्ट लिजिंग कंपनी लिमिटेड कडून एअरक्राफ्ट लिज वर घेतली होती. ज्याच्या पेमेँसाठी कंपनीने कोर्टाचा दरवाजा ठोठावला. तिथेच ब्रिटनच्या कोर्टाने एअर इंडियाच्या बाजूने निकाल देताना सांगितले की, कोविड -१९ आणि लॉकडाउनमुळे विमानाचे परिवहन होऊ शकलेले नाही. ज्यामुळे एअर इंडियाची आर्थिक परिस्थिती खालावली आणि पेमेंटमध्ये उशीर झाला.

11 जानेवारी पर्यंत एअर इंडियाला पैसे द्यावे लागतील – जज साइमन साल्जेदोने एअर इंडियाची याचिका स्वीकारली आणि त्यांना पेमेंट करण्यासाठी अधिकच वेळ दिला. पण त्यांनी एअर इंडियाच्या वकिलांना सुनावताना सांगितले की, कंपनीने योग्यरीत्या काम केलेले नाही. अशा प्रकारे एअर इंडियाला 11 जानेवारी 2021 पर्यंत पैसे द्यावे लागतील.

https://t.co/HgaSzSMDaa?amp=1

या अटींनुसार वेळ मिळाला आहे- ब्रिटनच्या कोर्टाकडून एअर इंडियाला 5 मिलियन डॉलर्सचे पेमेंट करण्यास काही अटी देण्यात आलेल्या आहेत. अशातच चीनच्या कंपनीने कोर्टाकडे त्वरित पूर्ण पैसे मिळण्याची मागणी केली आहे. यावर एअर इंडियाने सांगितले की, सध्या ते पेमेंट करण्याच्या स्थितीत नाही आणि कोविड -१९ मुळे विमानाची वाहतूकही कमी आहे त्यामुळे पेमेंट्ससाठी 29 जानेवारीपर्यंतची तारीख दिली जावी. पण जज चीनच्या कंपनीला 5 मिलियन डॉलर्सचे पेमेंट करण्यासाठी एअर इंडियाला 11 जानेवारी रोजी पर्यंतची वेळ दिलेली आहे.

https://t.co/trzvRusgxQ?amp=1

एअर इंडियामध्ये आपली हिस्सेदारी विकणार आहे केंद्र सरकार – केंद्र सरकार एअर इंडियाची 100 टक्के हिस्सा विकणार आहे. सरकारने यासाठी जानेवारी मध्ये निविदा देखील मागितली होती. त्यासाठीची शेवटची तारीख 17 मार्च रोजीची होती. पण कोविड -१९ मुळे आतापर्यंत हा सौदा झालेला नाही.

https://t.co/8msbBVlYag?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment