दुर्दैवी घटना ! बुडणाऱ्या भाच्यांना वाचवताना मामाचाही बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

वाण नदीच्या पात्रातील पाणीच्या डोहामध्ये बुडणाऱ्या भाच्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा हि बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात घडली आहे. यात दोन सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर सोनपेठ तालुक्यात शोककळा पसरली आहे.

सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील एक महिला दसरा सणानिमित्त कपडे धुण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी गावाशेजारील वाण नदी पात्रात गेली होती. यावेळी त्यांच्या सोबत शिवम सुरेश मुळे (वय ८) व शिवकन्या सुरेश मुळे( वय १५) हे मुलगा व मुलगी सोबत गेले होते. यावेळी लहानग्या बहिण भावंडांचा वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तोल जाऊन पडल्याने यावेळी ते बुडत असल्याने तिथे उपस्थित असलेला त्यांचा मामा सचिन संभाजी बोडके ( वय २० )रा .दहीखेड सोनपेठ याने पाण्यात उडी घेत यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवम व शिवकन्या यांच्यासह सचिनचाही दुर्दैवाने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

दरम्यान घटनेची माहिती कळताच घटनास्थळी सोनपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. इंग्रजी यावेळी भोई समाजातील तरुणांनी मतदान शोधण्यास मदत केली. शिवमचा मृतदेह सापडल्यानंतर पाच ते सहा तासानंतर इतर दोन मृतदेह पाण्यातून बाहेर काढता आले. घटनेमध्ये सख्या बहिण भावाचा व त्यांना वाचवताना मामाचा मृत्यू झाल्याने सोनपेठ तालुक्यात शोककळा पसरली आहे .

Leave a Comment