प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत 34 कोटींहून जास्त लाभार्थ्यांना मिळाले 18.60 लाख कोटी रुपयांचे कर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । वित्त मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की,” सात वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) आतापर्यंत 34.42 कोटींहून जास्त लाभार्थ्यांना 18.60 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.” 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉन-कॉर्पोरेट आणि बिगर-शेती लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी PMMY लाँच केले होते.

अर्थमंत्र्यांचे स्टेटमेंट
या योजनेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की,” या योजनेअंतर्गत उघडण्यात आलेली ही खाती उत्पन्न कमावणारी आहेत. त्या म्हणाल्या की,” या योजनेमुळे विशेषतः लहान व्यवसायांसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्यात आणि तळागाळात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात मदत झाली आहे.” अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेंतर्गत मंजूर झालेल्या कर्ज खात्यांपैकी 68 टक्के महिलांची आहेत आणि 22 टक्के कर्जे अशा नवउद्योजकांना देण्यात आली आहेत ज्यांनी सुरुवातीपासून कोणतेही कर्ज घेतलेले नाही.

त्यांनी सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन आणि इतर संभाव्य कर्जदारांनी पुढे येऊन राष्ट्र उभारणी प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यासोबतच त्यांनी सांगितले की, आतापर्यंत मंजूर झालेल्या एकूण कर्जापैकी 51 टक्के कर्ज हे एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गासाठी दिले जात आहे. त्या पुढे म्हणाल्या की, “प्रधानमंत्री मुद्रा योजना ही सामाजिक न्यायाचे प्रतीक आहे आणि ते पंतप्रधानांच्या संकल्पनेतील ‘सबका साथ सबका विकास’ च्या खऱ्या भावनेचे प्रतीक आहे.”

योजनेबद्दल
PMMY योजनेअंतर्गत, नवउद्योजकांना आणि उत्पन्न वाढवणाऱ्या उपक्रमात गुंतलेल्या शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. हे कर्ज PMMY अंतर्गत अनुसूचित व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, स्मॉल फायनान्स बँका, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या यांसारख्या सदस्य संस्थांद्वारे कोणतेही तारण न घेता दिले जाते. हे कर्ज तीन प्रकारात दिले जाते. पहिली श्रेणी शिशू आहे, ज्यामध्ये 50,000 रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. दुसरी श्रेणी किशोर आहे, ज्यामध्ये 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे, आणि तिसरी श्रेणी तरुण आहे, ज्यामध्ये 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

Leave a Comment