“श्रीनिवास दादासाहेब पाटील यांच्या आश्रयाखाली” ; वाचा एक अप्रतिम असा किस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वयाच्या ८० व्या वर्षी आपला मित्रा एकटा पडतोय. त्याच्या पक्षाला आणि त्याला आज खऱ्या अर्थाने आपली गरज आहे म्हणून त्याला साथ देणारा मित्र,त्याला आपण साथ दिलीच पाहिजे म्हणून थेट साताऱ्याच्या गादीचा वंशज असणाऱ्या व्यक्तिमत्वासमोर दंड थोपटून उभा राहणारा माणूस अशा अनेक बिरुदात आपण साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचं कौतुक ऐकलं असेलच.पण खास “हॅलो महाराष्ट्र”च्या वाचकांसाठी आम्ही श्रीनिवास पाटील यांचा हा एक किस्सा आम्ही घेऊन आलो आहोत. ज्याचं नाव आहे “आदरणीय श्रीनिवास पाटील यांच्या आश्रयाखाली”.

विठ्ठलभाई मणियार हे नाव तसं शरद पवार, श्रीनिवास पाटील यांच्या जवळच्या मित्राचे नाव.याच विठ्ठल भाई मणियार यांनी “विठ्ठलनामा” नावाचं पुस्तक लिहिलंय.या पुस्तकात पवार साहेबांच्या,श्रीनिवास पाटील आणि मित्रमंडळीच्या बऱ्याच आठवणी विठ्ठलभाईंनी यांनी सांगितल्या आहेत.

त्यात “मस्त कलंदर” नावाच्या प्रकरणात मणियार श्रीनिवास पाटील यांच्या विषयी लिहितात.की मूळचा कऱ्हाड, सातारा या ठिकाणाहून पुण्यात शिकायला आलेला हा मुलगा चांगल्या स्वभाव गुणामुळे आमचा खूप चांगला मित्र झाला.या श्रीनिवासचे वडील दादासाहेब पाटील हे कऱ्हाड येथील प्रसिध्द व्यक्तिमत्त्व आणि मातब्बर शेतकरी. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण साहेबांचा प्रचंड प्रभाव.म्हणून श्रीनिवासने सुद्धा चव्हाण साहेबांच्या सारखचं बी.ए. एम.ए. आणि एल.एल.बी. करावं अशी त्यांची इच्छा. पुढे हाच श्रीनिवास यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून एम.पी.एस. सी.परीक्षेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत गेला.

करवीर या ठिकाणाहून डेप्युटी कलेक्टरची पदापासून सुरवात करतं पुढे पुण्याचा कलेक्टर झाला हे आपल्याला माहितेय.पण उपजतचं लोकांना मदत करणारा हा माणूस आहे.याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतलाय. नारायणगाव,संगमनेर या परिसरात तमाशाचे अनेक फड आहेत. त्यात कांताबाई सातारकर यांचा फड काही कारणामुळे आर्थिक अडचणीत आला.श्रीनिवास पाटील हमखास मदत करतील म्हणून त्या श्रीनिवास पाटलांकडे गेल्या श्रीनिवासनेही बँक अधिकाऱ्यांशी बोलून हवी ती मदत करण्याची सूचना केली. त्यामुळे कांताबाईला कर्ज मिळाले. तमाशा फड व्यवस्थित सुरू झाला.त्या दिवसापासून शांताबाई श्रीनिवास पाटील यांना भाऊ मानू लागल्या.

असेच आम्ही सगळे मित्र एकदा करकुंभ शिवारात फिरत होते.तेथे आम्हाला एक फड दिसला. श्रीनिवास आम्हाला तेथे घेऊन गेला.तो फड “कांताबाई सातारकर आणि रघुवीर खेडकर” यांचा होता.या फडाच्या व्यासपीठावर श्रीनिवास पाटील यांचा फोटो होता आणि फोटोवर लिहिलं होतं “श्री. श्रीनिवास दादासाहेब पाटील यांच्या आश्रयाखाली”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like