“मी एटीएम मधून पैसे काढून देतो” अस म्हणत घातला 20 हजारांना गंडा ; पहा कोठे घडली ही घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मी तुम्हाला पैसे काढून देतो, तुम्हाला वेळ लागतोय, मला खूप गडबड आहे असे म्हणून एकाने एटीएम कार्डचा पिनकोड माहिती करून घेऊन हातचलाखीने एटीएममधील 20 हजार रूपये काढून एकाची फसवणूक केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद चंद्रकांत शंकर माने (वय 35, रा. गोळेश्‍वर, ता. कराड) यांनी शहर पोलिसात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंद्रकांत माने हे घरखर्चासाठी पैसे काढण्यासाठी शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास कराडातील पंजाब नॅशनल बँकेखालील मजल्यात असलेल्या एटीएम मशिनमध्ये गेले होते. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या पाठीमागे आला. त्यावेळी माने यांनी त्याला बाहेर जाणेसाठी सांगितले असता तो तेथेच थांबून राहिला. त्यावेळी माने यांनी एटीएममध्ये कार्ड काढून पिनकोड टाकून पाच हजार रूपये काढले. त्यानंतर आणखी पैसे काढायचे असल्याने मी पुन्हा एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकले.

त्यावेळी मागे असलेल्या अज्ञात इसमाने मी तुम्हाला पैसे काढून देतो, तुम्हाला वेळ लागतोय, मला खूप गडबड आहे असे म्हणून माने यांचा विश्‍वास संपादन करून त्या इसमाने एटीएम कार्ड घेतले. तेव्हा पैसे निघाले नाहीत. व तो इसम इथे खूप गर्दी आहे, मी जातो असे म्हणून तो एटीएम मधून निघून गेला, त्यानंतर कार्ड एरर दाखवत असल्याने मी तेथून बाहेर आलो.त्यानंतर थोड्या वेळाने 12.40 वाजता माने यांच्या मोबाईल वर 10 हजार रूपये काढल्याचा मेसेज आला.

त्यावेळी माने यांना अनोळखी इसमाविषयी शंका आली. म्हणून त्यांनी एटीएम कार्ड पाहिले असता त्यांच्याकडे दुसरेच एटीएम कार्ड असल्याचे लक्षात आले. त्यावेळी माने यांना आणखी 10 हजार रूपये काढल्याचा मेसेज मोबाईलवर आला. त्यावेळी माने यांची अज्ञात इसमाने त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आले. याबाबत माने यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खान करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment