Union Budget 2023 : महागाईपासून ते बेरोजगारी पर्यंत… सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला (Union Budget 2023) सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सामान्य अर्थसंकल्प 2023-24 (केंद्रीय अर्थसंकल्प 2023) संसदेत सादर करणार आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील हा चौथा अर्थसंकल्प असेल. आणि मुख्य महत्वाचे म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार देशातील सर्वसामान्य जनतेसाठी नेमक्या कोणकोणत्या घोषणा करणार याकडे देशवासीयांचे लक्ष असेल. देशात गेल्या काही वर्षांपासून वाढलेली महागाई, बेरोजगारी यातून जनतेची सुटका होणार का? हे पहावं लागेल. चला जाणून घेऊया सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधित अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्यातून जनता दिलासा मिळवण्याची अपेक्षा करत आहे.

1) महागाई-

सध्या देशातील जनतेपुढे सर्वात (Union Budget 2023) मोठा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे महागाईचा… जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे तसेच पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरामुळे आधीच सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीचा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा जनतेला असेल. महागाई नियंत्रणात आणणाऱ्या उपाय योजना सरकारने कराव्या अशी इच्छा सामान्य नागरिक बाळगून आहेत.

2) बेरोजगारी- Union Budget 2023

एकीकडे ज्या झपाट्याने महागाई (Union Budget 2023) वाढत आहे त्याच झपाट्याने दुसरीकडे बेरोजगारीचा आलेखही वाढताना दिसत आहे. नोकऱ्यांच्या अपुऱ्या संधी असल्याने तरुणांमध्ये निराशेचे वातावरण आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारी धोरणे सरकारने राबवावीत अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला आणि खास करून देशातील युवा वर्गाला आहे.

3) आरोग्य सेवा आणि शिक्षण-

शिक्षण आणि आरोग्य या दोन्हीचे महत्व आपल्या आयुष्यात अमूल्य आहे. देशातील आरोग्य सुविधा वाढवणे, तळागाळातील लोकांपर्यंत आरोग्य केंद्र पोचवणं गरजेचं आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण आणि (Union Budget 2023) आरोग्यासाठी जास्तीत जास्त निधीची अपेक्षा सर्वसामान्य जनतेला आहे.

4) ग्रामीण विकास-

देशातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. खास करून शेतकरी वर्ग हा गावातच राहत असल्यामुळे ग्रामीण विकासावर सरकारने भर द्यावा आणि ग्रामीण भागातील जीवनमान सुधारणाऱ्या योजना आणाव्या तसेच शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मोठं पॅकेज जाहीर करावं अशी अपेक्षा सामान्य शेतकऱ्याला असू शकते.