फडणवीसांनी घेतली अमित शहांची अचानक भेट; राज्यात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेला उधाण

नवी दिल्ली । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोघांमध्ये किमान तासभर चर्चा झाली. दरम्यान  ऑपरेशन लोटस तयार झालेलं नाही. त्याची चर्चाही झाली नाही. या भेटीतील चर्चेचे विषय महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि शेतकऱ्यांना करायची मदत असे होते. यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता असं देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. तसंच महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कुठलंही स्वारस्य नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

ठाकरे सरकार पाडण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही. हे सरकार ३ पक्षांच्या अंतर्विरोधाने कोसळणार आहे. जेव्हा हे सरकार कोसळेल तेव्हा काय करायचं ते पाहू. आज मी अमित शाह यांना भेटलो यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. कोरोनाची महाराष्ट्रातली स्थिती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती या २ गोष्टी मी त्यांच्याशी बोलल असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

राजस्थानातील राजकीय घडामोडीवर फडणवीस यांना प्रश्न केला असतात ते म्हणाले की, मी महाराष्ट्रातला माणूस आहे. देशात काय चालतं, राज्यांमध्ये काय चालतं ते ठाऊक नाही. मी महाराष्ट्रातला नेता आहे. साखरेशी संबंधित विषयात शरद पवार यांचं नाव पुढे आलं नाही असं विचारलं असता शरद पवार त्यांचं काम करत आहेत आणि आम्ही आमचं काम करत आहोत असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”