ओमीक्रॉनबाबत केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार यांचे महत्वाचे विधान; म्हणाल्या की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात ओमीक्रॉन व्हेरिएंट चिंतेचा विषय बनला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असल्याचा अद्याप कोणताही पुरावा नसल्याची माहिती सिंगापूर आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ओमिक्रोनबाबत केंद्र सरकारकडून महत्वाचे धोरण अंलबजावणी केली जात आहे. दरम्यान केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे. “या नव्या व्हेरियंटबाबत केंद्र स्तरावर खूप चर्चा झाली आहे. या व्हायरसबाबत देशातील व राज्यातील सरकारने सतर्क राहिले पाहिजे,असे डॉ. पवार यांनी सांगितले

डॉ. भारती पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाकडून व्हेरियंटबाबत केल्या जात असलेल्या उपाययोजना आणि अंलबजावणी याबाबत माहिती दिली. यावेळी त्या म्हणाल्या की, या नव्या व्हेरियंटबाबत राज्य सरकारने काळजी घेतली पाहिजे. जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेने नव्या व्हेरियंटबाबत घोषणा केली. तेव्हा केंद्र सरकारनेही याबाबात घाबरदारी घेत राज्यांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्राबाबत सांगायचे झाले तर येथील राज्य सरकारलाही विशेष सूचना करण्यात आलेल्या आहेत. ओमिक्रोनबाबत केंद्र व राज्य सरकारमध्ये मतभेद नाही, असेही डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

बूस्टर डोसबाबत सांगायचे झाले झाले तर देशाची खूप मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या स्वरूपात डोस देण्याअगोदर याबाबात जागतिक आरोग्य संघटना काय सांगते हे पाहिले पाहिजे. त्यांच्या सूचनेवर बूस्टर डोसबाबत निर्णय घेतले जातील, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

You might also like