मी कोणताही गुन्हा केलेला नाही; पाहूया शिवसेना कुठपर्यंत उडी मारतेय ते; नारायण राणेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर आज पुन्हा राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. तुम्हाला काय नॉर्मल माणूस वाटला आहे कि काय? कोण शिवसेना? माझ्याविरोधात कोणी बदनामी करायचे काम केले तर त्याविरोधात मी गुन्हा दाखल करेन. मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही. दगडफेक करणे यात पुरुषार्थ नाह, असे म्हणत मंत्री राणेंनी पुन्हा शिवसेनेला इशारा देत हल्लाबोल केला आहे.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, माहितीच्या आधारावर मी एकही उत्तर देणार नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. ज्यावेळेला उद्धव ठाकरे थोबाड फोडू आहे असे म्हणतात. त्यावेळेला त्यांच्यावर गुन्हा दाखल का दाखल होत नाही. आज त्यांनी ऑफिस फोडली. उद्या ते माझ्या घरावरही दगड फेक करतील. मग काय करायचे. लाकपासून पाहतोय. मला अटक होणार ते. मला अटक करण्यासाठी काय नॉर्मल वाटतो कि काय. शिवसेनेला जे काय करायचे आहे ते करू दे आम्ही पाहू पुढे काय करायचे ते, आसेहि यावेळी मंत्री राणे म्हणाले.

मंत्री राणेंनी नुकतीच माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मी कुणाला घाबरत नसल्याचे त्यांनी म्हणाले.मंत्री राणेंच्या पुन्हा शिवसेनेला दिलेल्या इशाऱ्यानंतर आता शिवसेना व भाजपमध्ये व नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद अजून विकोपाला पोहचला आहे.

Leave a Comment