…तर मी ते खपवून घेणार नाही; केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली. आरोग्य विभागातील गलथान कारभारावरून त्यांनी संताप व्यक्त केला. रुग्णांसाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येत असेल, तर मी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला..

शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने भारती पवार संतापल्या होत्या. रुग्णालयात जर कर्मचारी नसतील तर कंत्राटी पद्धतीने पदे भरा. मात्र, मला रुग्णांची हेळसांड झालेली चालणार नाही, अशी समज त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी त्यांनी दिल्लीतील आरोग्य विभागाच्या कारभाराचा दाखला दिला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 जानेवारी पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाची घोषणा केली याबाबत बोलताना त्यांनी म्हणल की यामुळे मुलांना देखील एक सुरक्षाकवच मिळाले आहे. मात्र संकट अजूनही टळले नाही त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलं.

Leave a Comment