‘अनिल देशमुखजी, आप कोरोनासे मत डरोना’; रामदास आठवलेंच्या कोरोनाग्रस्त गृहमंत्र्यांना हटके शुभेच्छा

मुंबई । केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कोरोनातून लवकर बरे होण्याच्या काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांना शुक्रवारी कोरोनाची (Corona virus) लागण झाली आहे. आपण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यात्मक शैलीत कोरोनाबाधित देशमुखांना कोरोनापुढे न हरण्याची सूचना केली आहे. रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये ”अनिल देशमुखजी, आप करोना से मत डरोना. मैने तो बोला हैं गो करोना, करोना से मत हरोना”, असं म्हणत आठवले यांनी प्रकृती सुधाराच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आठवले यांनी दिलेल्या शुभेच्छांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आभार मानले आहेत. आपण मला करोनातून सुखरूप बरे होण्याची जी सदिच्छा व्यक्त केली, त्याबद्दल मी आपला ऋणी असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. आपली सदिच्छा आणि पाठिंब्याच्या जोरावर मी ही लढाई जिंकेन, असा मला ठाम विश्वास आहे, असे म्हणत देशमुख यांनी आठवले यांचे आभार मानले आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठवले यांना त्यांच्या काव्यात्मक शैलीत शुभेच्छा दिल्या होत्या. ”कोरोना-गोचा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा. धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का”, असं ट्विट देशमुख यांनी त्यावेळी केलं होत.

मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like