Sunday, March 26, 2023

राहुल गांधींनी दलित महिलेसोबत लग्न करावं; रामदास आठवलेंचा सल्ला

- Advertisement -

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले कायम आपल्या वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. आताही त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींबाबत (Rahul Gandhi) असंच एक विधान केलं आहे काँग्रेस नेते राहुल यांनी आता विवाहबद्ध व्हावं. त्यातल्या त्यात एखाद्या दलित महिलेशी (Dalit Woman) राहुल गांधींनी विवाह केला तर अधिक चांगलं, असा सल्ला रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना दिला आहे.

”मला हा विश्वास आहे, की राहुल हे माझे चांगले मित्र आहेत. आणि सध्या ते ‘हम दो हमारे दो’विषयी बोलत आहेत. हे घोषवाक्य वापरलं गेलं होतं, ते कुटुंब नियोजनाबाबत (family planning). आता राहुल गांधी यांना ‘हम दो हमारे दो’ पाहिजे असतील तर त्यांनी लग्न केलं पाहिजे. त्यांनी त्यातही दलित महिलेशी लग्न केलं, तर महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यास हातभार लागेल. यातून जाती निर्मूलनही होऊ शकेल. यातून सर्व तरुणांनाही एक दिशा मिळेल.’ असं आठवले म्हणाले असल्याचे वृत्त एएनआयनं दिलं आहे.

- Advertisement -

‘त्यामुळं राहुल यांनी आता लग्न करावं. त्यातल्या त्यात दलित महिलेलाच त्यांनी जोडीदार म्हणून निवडावं. हा माझा राहुल यांना सल्ला आहे.’ रामदास आठवले सध्या केंद्रात सामाजिक न्याय मंत्री आहेत. या भूमिकेतून त्यांनी अशीही पुस्ती जोडली, की केंद्र सरकार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला अडीच लाख रुपयांची मदत करतं. राहुल गांधी यांना आम्ही या योजनेचाही लाभ मिळवून देऊ.

राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत भाषण  करताना सरकारवर हल्ला चढवला. ‘हम दो हमारे दो’ असं उपरोधानं बोलत ते म्हणाले, ‘केंद्र सरकारनं आणलेले नवीन कृषी कायद्यांमुळे बाजार समिती व्यवस्था कोसळून पडेल आणि अनिर्बंध साठेबाजीलाही प्रोत्साहन मिळेल.’ असं आठवले यांनी म्हटलंय.