कराड | स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधुन विजय दिवस समारोह समितीच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले. त्याला शहरातील नागरीक, महिला, शालेय विद्यार्थी यांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरात विजय दिवसची चांगलीच वातावरण निर्मीती झाली. विजय दिवस समारोह समितीचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी येथे यंदा दिमाखदार विजय दिवस समारोहाचे कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. त्यानिमित्त विजय दिवस समारोह समितीच्यावतीने यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले.
दौडमध्ये विद्यार्थ्यांसह, शहरातील नागरिक व महिला सहभागी झाले. येथील विजय दिवस चौकात सकाळी नऊ वाजता माजी आमदार आनंदराव पाटील, कर्नल संभाजीराव पाटील यांच्याहस्ते झेंडा दाखवून दौडचा प्रारंभ झाला. यावेळी उद्योजक सलीम मुजावर, सह्याद्री हॉस्पीटलचे दिलीप चव्हाण, मनसेचे सागर बर्गे, उद्योजक इरफान सय्यद यांच्या हस्ते त्यास प्रारंभ झाला. यावेळी सौ. संध्या पाटील, पौर्णिमा जाधव, विजय दिवस समितीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते, माजी प्राचार्य गणपतराव कणसे, विनायक विभुते, चंद्रकांत जाधव, सहसचीव विलासराव जाधव, २४ मराठा लाईट इंन्फट्रींचे मेजर सुयेश मिश्रा, कमांडीक ऑफीसर कश्यप कृष्णन, कॅप्टन मोहित सिंग, सुभेदार मेजर दत्ता डांगे, सुभेदार अशोक कर्डीले, महेंद्र भोसले, भरत कदम, अॅड. परवेझ सुतार, रजनीश पिसे, महालिंग मुंढेकर, रमेश जाधव, सतीश बेडके, रत्नाकर शानभाग, प्रा. बी. एस. खोत, राजु अपिने, पौर्णिमा जाधव, साधना राजमाने, रुपाली जाधव, मंगेश कुलकर्णी, मिल्ट्री होस्टेलचे सहाय्यक अधिक्षक धनाजी जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.
दौड दत्त चौकातून दौड आझाद, नेहरू, चावडी चौकापर्यंत गेली. त्यानंतर मुख्य रस्त्यावरून दौड कन्या शाळा, कृष्णा नाका येथून स्टेशन रस्ता, उपजिल्हा रुग्णालयासमोरुन विजय दिवस चौकापर्यंत आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जवळ दौडचा समारोप झाला. तेथे विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.