पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील पिंपरी या ठिकाणी पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आरोपी पतीकडून हा भयंकर प्रकार सुरू होता. यानंतर पतीच्या या कृत्याला वैतागून पीडित महिलेनं देहूरोड पोलीस ठाण्यात पती, सासू, दीर आणि नणंद यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी घरगुती हिंसाचारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
पीडित महिलेने आपल्या पतीसह सासू, दीर आणि नणंद यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. तिने आपल्या तक्रारीत गेल्या बऱ्याच दिवसांपासून आरोपींनी पीडित विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच पीडीत महिलेला काळी, बुटकी असं बोलून सतत टोमणे दिले आहेत. याचबरोबर लग्नात सोनं कमी दिल्याच्या कारणातून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोपसुद्धा पीडित महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.
तसेच सासू आणि नणंद यांनी पीडित महिलेचे डोक्यावरील केस पकडून मारल्याचंही पीडितेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. इतकेच नाहीतर पीडित महिलेच्या पतीने तिला पॉर्न व्हिडीओ दाखवून तिची इच्छा नसताना, अनैसर्गिक शरीर संबंध ठेवले. हा सगळा धक्कादायक प्रकार 28 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर दरम्यान नाशिक येथील देवळाली कॅम्प या ठिकाणी घडला. यामध्ये आरोपींनी पीडितेला नरक यातना दिल्या. अखेर आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात जाऊन आपली तक्रार दाखल केली.