निवडणूक बिनविरोध : पाटण तालुका दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी सुभाषराव पवार, उपाध्यक्षपदी शांताराम सुर्यवंशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका दूध उत्पादक संघाच्या पदाधिकारी निवडी बिनविरोध पार पडल्या. नूतन चेअरमनपदी सुभाषराव पवार व व्हाइस चेअरमनपदी शांताराम सूर्यवंशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

पाटण तालुका दूध संघाच्या निवडणुकीत संचालक म्हणून मावळते चेअरमन शंकरराव जाधव, व्हा. चेअरमन शांताराम सूर्यवंशी, सुभाषराव पवार, आबासो सूर्यवंशी, सुरेशराव पाटणकर, अविनाश घाडगे ,सखाराम लुगडे, मनोहर संकपाळ, अशोकराव मोरे, विजय शिंदे, महिला प्रतिनिधी शोभा कदम, अक्काताई काळे, इतर इतर मागासवर्गीय मधून सुंदर गुरव (पुजारी), अनुसूचित जातीमधून विकास शिलवंत, भटक्या विमुक्त जातींमधून भागोजी लांबोर यांच्या बिनविरोध निवडी पार पडल्या. शुक्रवारी पदाधिकारी निवडीही बिनविरोध पार पडल्या व यात चेअरमनपदी सुभाषराव पवार यांची व व्हाईस चेअरमनपदी शांताराम सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.

नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार ,उपसभापती प्रतापराव देसाई, माजी जि. प. शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, पाटण अर्बन बँके चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, खरेदी-विक्री संघ चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, कोयना शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर ,शेती बाजार समिती सभापती रेखाताई पाटील , अर्बन बँक माजी चेअरमन दिनकरराव घाडगे आदी मान्यवर पदाधिकारी ,कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभिनंदन केले .

Leave a Comment