बिनविरोध : तांबवे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुरेश पाटील यांची फेरनिवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | तांबवे (ता. कराड) येथील ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न झाली. या सभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुरेश पाटील यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. कोविड 19चे सर्व नियमांचे पालन करीत सरपंच सौ. शोभाताई शिंदे यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीचे वातावरणात ग्रामसभा संपन्न झाली.

कोरोना रोग नियंत्रण, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, वृक्षलागवड, साथरोग नियंत्रण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सह्याद्रीचे संचालक रामचंद्र पाटील, माजी सरपंच जावेद मुल्ला, सदस्य धनंजय ताटे, देवानंद राऊत, सतिश पाटील, ग्रामसेवक टी. एल. चव्हाण, तलाठी सचिन ढवण, वन अधिकारी मंगेश वंजारे, पोलिस पाटील पवन गुरव यांचेसह ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामसभेत पाटील इलेक्ट्राॅनिक्स इन्स्टिट्यूटचे प्राचार्य सुनिलकुमार पाटील यांना एक्सलंट टिचर्स ॲवार्ड मिळाल्याबददल त्यांचे बंधू अनिलकुमार पाटील यांचा सत्कार केला. तर विषय पत्रिकेचे वाचन ग्रामविकास अधिकारी टी. एल. चव्हाण यांनी केले. स्वागत उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील यांनी केले. आभार सरपंच सौ. शोभाताई शिंदे यांनी मानले.

Leave a Comment