खूनाचा तपास करताना अजून एका खूनाचा उलगडा; दोन्ही खून प्रकरणात सख्या बहिणींनी पतींचाच काढला काटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचोड | आठ दिवसांपूर्वी अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाच्या तपासासाठी गेलेल्या पाचोड पोलिसांनी नऊ वर्षापूर्वी झालेल्या आणखी एका खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे तो खूनही अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षकांनी पाचोड पोलिसांचे कौतुक केले आहे.

पाचोड हद्दीत 19 मे रोजी कडेठाण येथील अशोक बाबासाहेब जाधव यांचा पत्नीने अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने खून केल्याचे प्रकरण समोर आले. अशोक जाधव यांची पत्नी रंजना हिने दोन लाख रुपये सुपारी देऊन बहिण मीना पठाडे (करजगाव, ता. औरंगाबाद) हिला नवर्याचा खून करण्यास सांगितले होते. तिने बदनापूर येथील संतोष पवार याला खुनाची सुपारी दिली. याच खुनाचा तपास करण्यासाठी पाचोड पोलिसांनी रंजनाची बहिण मीना पठाडे हिला ताब्यात घेतले. तिला पोलीस खाक्या दाखविताच तिने अशोक जाधव यांच्या खुनाची सुपारी संतोष पवारला देऊन तिच्याकडून खून करून घेतल्याची कबुली दिली.

यानंतर सपोनि. सुरवशे यांनी मीना पठाडेकडे तिच्या परिवाराबद्दल खोदून चौकशी केली. सुरुवातीला तिने टाळाटाळ केली; मात्र नंतर नऊ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा झाला. हा खून खुद्द मीना पठाडे हिने स्वतःच्या पतीचा केल्याचे कबूल केल.मीनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिचे बदनापूर येथील संतोष पवार सोबत अनैतिक संबंध होते. ही बाब पती मन्साराम पठाडे यांना माहित पडल्यानंतर ती मीना ला त्रास देऊ लागले. त्यानंतर तिने पवारला त्यांचा काटा काढायला सांगितला. त्यानुसार संतोष पवारने 15 फेब्रुवारी रोजी साथीदारांच्या मदतीने मन्साराम पठाडे यांचा गळा आवळून खून केला. त्यावेळी या खुनाचा उलगडा झाला नव्हता.
सपोनि. गणेश सुरवसे, पोआनि. सुतळे, सुरेश माळी आदींच्या पथकाने उघडकीस आणला.

Leave a Comment