सावधान ! गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंप डीलरशिपच्या नावाखाली होत आहे फसवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फसवणूक करणारे कोरोनाव्हायरसच्या या संकटातही नवीन पद्धतीने लोकांना चुना लावत आहेत. ऑईल मार्केटिंग कंपन्या (OMCs) म्हणून ओळखल्या जाणार्‍या फेक वेबसाइटवरून लोकांना गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपच्या डीलरशिपसाठी अर्ज करण्यासाठीची ऑफर दिली जात आहे. जर तुम्हालाही अशी जाहिरात दिसत असेल तर सावधगिरी बाळगा. अशा प्रकारच्या बनावट जाहिराती आणि वेबसाइट्स आपले मोठे नुकसान करु शकतात. देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन असलेल्या ऑईलने याबाबतचा इशारा दिला आहे.

गॅस एजन्सीच्या नावे याप्रकारे केली जात आहे फसवणूक
IOC च्या वेबसाइटनुसार काही अज्ञात व्यक्तींनी किंवा बोगस एजन्सीने ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या नावावर एक बनावट वेबसाइट तयार केली आहे. ही बनावट एजन्सी पंतप्रधान उज्ज्वला योजना किंवा राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरक (आरजीजीएलव्ही) योजनेंतर्गत लोकांना एलपीजी वितरक बनविण्यासाठी खोटी ऑफर देत आहे. IOC ने याबाबत सांगितले आहे की तुम्ही एलपीजी डिस्ट्रीब्यूटरशिप ची ऑथेंटिकेशन तसेच अधिकृत माहितीसाठी OMCsच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधा किंवा www.lpgvitarakchayan.in ला भेट द्या आणि फसवणूक टाळा.

 

फेक वेबसाइटपासून दूर रहा
पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज केलेल्या बनावट वेबसाइटबद्दल इंडियन ऑईलने ट्विट केले आहे. इंडियन ऑईलच्या मते, https://petrolpampdealerchayan.in हि एक फेक वेबसाइट आहे. अशा वेबसाइट्सच्या जाळ्यात न अडकण्याचा इशारा कंपनीने सर्वसामान्यांना दिला आहे.

जर आपल्याला पेट्रोल पंपच्या डीलरशिपबद्दल काही माहिती हवी असेल, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या जवळच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधा किंवा https://petrolpumpdealerchayan.in ला भेट द्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment