Upcoming Expressway In India : भारताच्या अर्थव्यवस्थेत भर घालणारे ‘हे’ 5 Expressway नवीन वर्षात सुरु होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Upcoming Expressway In India : भारतात एक्सप्रेसवे हे उच्च बांधकाम असलेले, सर्व सोयीयुक्त महामार्ग आहेत. भारतात एक्सप्रेसवेची एकूण लांबी 5,145 किमी (3,197 मैल) आहे. या एक्सप्रेसवेचे निर्माण करताना त्याचे स्ट्रक्चर व डिझाईन अशी बनवली गेली आहे की, कमाल 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहने धावू शकतात. साहजिकच वेग जास्त असल्याने देशातील दळणवळण गतिमान बनते. प्रवास व मालवाहतूक गतिमान झाल्याने देशाच्या आर्थिक विकासात भर पडते. हे महामार्ग देशाच्या विकासात महत्वाची जबाबदारी पार पाडतात. राष्ट्रीय महामार्गावर बांधा, वापरा आणि कर भरा या तत्वावर सर्वत्र महामार्गांची बांधणी करण्यात आली आहे. देशातील बिजू एक्सप्रेसवे, जे वास्तविक राज्य महामार्ग आहेत त्यांना केंद्र सरकारने एक्सप्रेसवे म्हटलेले नाही. भारतातील प्रतीक्षेत असलेला ‘गंगा एक्सप्रेसवे’ हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असणार आहे. पण हा एक्सप्रेसवे 2025 मध्ये येणार आहे. 2024 मध्ये जे 5 एक्सप्रेसवे केंद्र सरकार आणणार आहे, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने भारतात नवीन वर्षामध्ये म्हणजेच 2024 मध्ये एकूण 5 सुसज्ज एक्सप्रेसवे (Upcoming Expressway In India) आणण्याचा निश्चय केला आहे. यासाठी अर्थात एक्सप्रेसवेचे बांधकाम व निर्माण सुरु आहे. NHAI ने भारतातील नागरिकांच्या सोयीसाठी 5 एक्सप्रेसवेची यादी केली आहे, जे एक्सप्रेसवे 2024 मध्ये भारतीय नागरिकांना लोकार्पण केले जाणार आहेत. बंगळूरू – चेन्नई एक्सप्रेसवे, दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवे, दिल्ली – मुंबई एक्सप्रेसवे, दिल्ली- अमृतसर – कत्रा एक्सप्रेसवे, द्वारका एक्सप्रेसवे असे ते 5 एक्सप्रेसवे आहेत.

बेंगळुरू-चेन्नई एक्सप्रेसवे (द्रुतगती मार्ग)-

सप्टेबर 2023 मध्ये केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी, 262 किलोमीटर लांबीचा बेंगळुरू-चेन्नई एक्सप्रेसवे 2024 या वर्षात खुला होईल, असे वचन दिले होते. बेंगळुरू-चेन्नई एक्सप्रेस हायवे 262 किलोमीटर लांबीचा आहे. 4-लेन महामार्ग बेंगळुरू महानगर प्रदेशातील होस्कोटे ते उपनगरी चेन्नईजवळील श्रीपेरुंबदूरपर्यंत सुरू होणार आहे. हा एक्स्प्रेस वे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या तीन राज्यांमधून जाणार आहे. या एक्सप्रेसवर कारसाठी वेगमर्यादा 120 किमी प्रति तास ठेवली गेली आहे. कर्नाटकातील बेंगळुरू ग्रामीण आणि कोलार, आंध्र प्रदेशातील चित्तूर, तामिळनाडूमधील रानीपेट्टई आणि कांचीपुरम अशा 5 जिल्ह्यांना जोडणारा हा एक्सप्रेसवे असणार आहे. या एक्सप्रेसवेवर होस्कोटे, मलूर, बंगारापेट, बेथामंगला, वेंकटागिरीकोटा, पलामनेर, बंगारुपालम, चित्तूर, रानीपेट, वालाजापेट, अरक्कोनम, श्रीपेरुंबदुर अशी शहरे येणार आहेत. चेन्नई पोर्ट-मदुरावायल एलिव्हेटेड एक्स्प्रेस वे प्रकल्पाचेही काम सुरू आहे.

दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवे (द्रुतगती मार्ग)-

दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवे, ज्याची राष्ट्रीय महामार्ग 72A (NH 72A) म्हणून गणती केली जाते. हा महामार्ग 210 किलोमीटर म्हणजे 130 मैल अंतराचा मार्ग आहे. भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथून सुरु होणारा हा एक्सप्रेसवे (Upcoming Expressway In India) उत्तराखंड राज्याची राजधानी डेहराडूनला जोडला गेला आहे. हा मार्ग दिल्ली – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांमधून जाणार असून बागपत, बरौत, शामली आणि सहारनपूर या शहरे या मार्गावर असणार आहेत. या मार्गाशी जोडणाऱ्या शहरांना जोडण्यासाठी त्यात दोन स्पर्स किंवा लिंक रोड असणार आहेत. 50.7-किलोमीटर-लांब (31.5 मैल), 6 -लेन-सहरानपूर-रुरकी-हरिद्वार द्रुतगती मार्ग, आणि दुसरा 121 – किलोमीटर – लांब ( 75 मैल), 6 – लेन अंबाला-शामली एक्सप्रेसवे यांचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाला ₹13,000 कोटी खर्च आला आहे. दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवेमुळे प्रवास वेळ आणि अंतर दोन्ही कमी होणार असून 5-6 तासांचा प्रवास निम्म्या वेळेत म्हणजे 2.5 तासांपर्यंत होणार आहे. तसेच 280 किलोमीटर (170 मैल) असलेले अंतर कमी होऊन ते 210 किलोमीटर (130 मैल) होणार आहे. साधारणत: जानेवारी – फेब्रुवारी 2024 मध्ये या द्रुतगती मार्गाचे लोकार्पण होणार आहे. हा द्रुतगती मार्ग उत्तराखंडमधील चार धाम असलेल्या शहरांना जोडला जाईल. याच द्रुतगती मार्गावर वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी राजाजी नॅशनल पार्कवर 12 किलोमीटर लांबीचा (7.5 मैल) उन्नत कॉरिडॉर बांधला जाईल. NH-44 नंतर वन्यजीव संरक्षण कॉरिडॉर असलेला हा भारतातील दुसरा द्रुतगती मार्ग असणार आहे.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (द्रुतगती मार्ग) – Upcoming Expressway In India

भारताची राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते भारताची आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणारा दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (द्रुतगती मार्ग) हा साधारणत: 1,350 किमी लांबीचा, 8-लेन रुंदी असलेल्या व भवितव्यात 12-लेनपर्यंत विस्तारण्यायोग्य द्रुतगती मार्ग आहे. तत्कालीन भाजपा नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 8 मार्च 2019 रोजी प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. भूसंपादन खर्चासह एकूण दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे प्रकल्पाचे मूल्य ₹1,00,000 कोटी आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग सोहना एलिव्हेटेड कॉरिडॉर, दिल्ली, दौसा, कोटा, रतलाम, वडोदरा आणि सुरत मार्गे जोडला जाणार आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचे राज्यनिहाय अंतर दिल्ली (12 किमी) आणि हरियाणा (129 किमी), राजस्थान (373 किमी), मध्य प्रदेश (244 किमी), गुजरात (426 किमी) आणि महाराष्ट्र (171 किमी) असे आहे. पूर्वी या मार्गावर प्रवासासाठी 24 तास प्रवास वेळ लागत असे, हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर 12 तास प्रवास वेळ लागणार आहे. मार्गाच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी जागा ठेवली गेली आहे. हा एक्सप्रेसवे, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (वेस्टर्न डीएफसी) सह दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा हिस्सा असणार आहे.

दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे –

दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे हा 670 किमी (420 मैल) लांबीचा असून 4-लेन (8 लेनपर्यंत विस्तारण्यायोग्य) रुंद केला जाणार आहे. हा द्रुतगती मार्ग हरियाणा आणि पंजाब मार्गे जम्मू आणि काश्मीरमधील कटरासह दिल्लीजवळील बहादूरगड सीमेला जोडला जाणार आहे. यात एक स्पर विभाग असणार आहे, जो नकोदरला राजा सांसी, अमृतसर येथील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडेल. 397.7 किमी (247.1 मैल) लांबीचा दिल्ली-नाकोदर-कटरा विभाग हा राष्ट्रीय द्रुतगती मार्ग 5 (NE-5) आहे आणि 99 किमी (62 मैल) लांबीचा अमृतसर-नाकोदर विभाग राष्ट्रीय द्रुतगती मार्ग 5A (NE-5A) आहे. एकदा प्रकल्प पूर्ण झाल्यावर, सध्याचे दिल्ली-कटरा अंतर 727 किमी (452 मैल) वरून 588 किमी (365 मैल) अंतरापर्यंत कमी होणार आहे. तसेच यासाठी लागणारा प्रवास वेळ 14 तासांवरून 6 तासांपर्यंत येईल. दिल्ली-अमृतसर अंतर 405 किमी (252) होईल आणि या दरम्यान प्रवासाठी निम्मा वेळ लागेल. म्हणजे 8 तासांवरून 4 तासांपर्यंत वेळ कमी होणार आहे. सदर द्रुतमार्गासाठी ₹40,000 कोटी खर्च अपेक्षित आहे. हा द्रुतगती मार्ग लुधियाना-दिल्ली-कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा एक भाग आहे. भारतात एकूण 11 राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर आणि अनेक राज्यस्तरीय औद्योगिक कॉरिडॉर आहेत.

द्वारका द्रुतगती मार्ग-

द्वारका द्रुतगती मार्ग NH 248-BB हा साधारणत: द्वारका एक्सप्रेसवे (Upcoming Expressway In India) म्हणून ओळखला जाणारा 27.6 किमी (17.1 मैल) लांबीचा आहे. 8-लेन (एलिव्हेटेड) आणि 8-लेन (सर्व्हिस रोड) असे एकूण 16-लेन एलिव्हेटेड ग्रेड आहेत. दिल्लीतील द्वारका ते हरियाणातील गुडगाव येथील खेरकी दौला टोल प्लाझाला जोडणारा एक्स्प्रेस वे वेगळा केला आहे. हा एक्सप्रेसवे दिल्लीतील महिपालपूर येथील शिवमूर्ती येथे NH 48 (जुन्या NH 8) च्या 20 मैल अंतरावरून निघतो आणि हरियाणातील गुडगावमधील खेरकी दौला टोल प्लाझाजवळ NH 48 च्या 40 किमीवर संपतो. द्वारका द्रुतगती मार्ग ₹7,500 कोटी खर्चाचा प्रकल्प असून 2006 मध्ये नियोजित होता, 2011 मध्ये कंत्राट देण्यात आले होते. याचा विस्तार करायचा म्हणून प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये आणखी काही किलोमीटर प्रकल्प मार्ग जोडले गेले आहेत. भूसंपादन आणि वृक्षारोपणाच्या अडथळ्यांमुळे प्रकल्पाचे विविध भाग विलंबित राहिले होते. या मार्गावरील जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला.