राज्यभरात महत्त्वाचे विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये मेट्रो प्रकल्प, रस्ते प्रकल्प, पूल बांधणी यांचा समावेश आहे. यातच राज्य सरकारचा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन चे काम देखील वेगाने सुरू असून सध्या याची काय परिस्थिती आहे याची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत. नॅशनल हायस्पीड रेल कॉरीडॉर लिमिडेटने याची माहिती दिली आहे.
सद्यस्थितीला मुंबई ते अहमदाबाद या ट्रेन साठी देशातील पहिला समुद्राखालील बोगदाचे काम सुरू आहे. वांद्रे कुर्ला संकुल येथील बुलेट ट्रेन भूमिगत स्थानक ते शिळफाटा दरम्यान हा 21 किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालचा बोगदा बांधण्यात येतो आहे. या बोगद्याच्या 21 km पैकी 16 किलोमीटर चा भाग हा टनेल बोरिंग मशीन द्वारे तर उर्वरित पाच किलोमीटरचा भाग हा एनएटीएम द्वारे आहे. यात ठाणे खाडीखालील जाणारा सात किलोमीटरचा बोगदा हा समुद्र खालून जाणार आहे.
या बोगद्याबाबतची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एडीआयटीच्या बोगदाचे 11 x 6.4 मीटर बांधकाम झाले आहे. या बोगद्याचा वापर ऑपरेशन दरम्यान मुख्य बोगद्यात थेट वाहनांना प्रवेश देत आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थलांतर प्रक्रियेच्या उद्देशाने हा बोगदा वापरास येऊ शकतो.
हा प्रकल्प बांधत असताना वेगवेगळ्या मशिनरींचा वापर केला जातो जे यापूर्वी कधीही वापरलेली नाहीयेत. बांधकाम स्थळांवर काही भाग झुकला किंवा कंपन झाला, सेटलमेंट क्रॅक आणि खचला तर याचे निरीक्षण करण्यासाठी अनेक यंत्रणांचा वापर केला जातो आहे. यामध्ये इनक्लीनोमीटर, व्हायब्रेशन मॉनिटर, ग्राउंड सेटलमेंट मार्कर, टिल्ट मीटर आदी विविध प्रकारची जिओ टेक्निकल उपकरणे बसवण्यात आली आहेत. खोदकाम आणि बोगदासारख्या सुरू असलेल्या भूमिगत कामांना किंवा जागेच्या सभोवताच्या वस्तूंना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी ही उपकरणे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
बुलेट ट्रेनसाठी ‘या’ ठिकाणी खोदकाम
- मुंबई एचएसआर स्थानकाच्या बांधकामस्थळी शाफ्ट 1 : शाफ्ट – 1 ची खोली 36 मीटर आहे, सेकेंट पायलिंगचे 100% टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित खोदकाम सुरू आहे.
- विक्रोळीतील शाफ्ट 2 : शाफ्ट-2 ची खोली 56 मीटर आहे, सेकेंट पायलिंगचे 100% टक्के काम पूर्ण झाले आहे. आजपर्यंत शाफ्टसाठीचे सुमारे 92% खोदकाम पूर्ण झाले आहे.
- सावली ( घणसोलीजवळ ) येथील शाफ्ट 3 : शाफ्ट-3 ची खोली 39 मीटर आहे, येथील 100% खोदकाम पूर्ण झाले आहे, त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस येथे पहिले टनेल बोअरिंग मशीन खाली जमिनीत टाकण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
- शिळफाटा : बोगद्याचे हे एनएटीएम टोक आहे. पोर्टलचे काम पूर्ण झाले असून आतापर्यंत 200 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे.
- एडीआयटी ( एडिशनल ड्रिव्हन इंटरमीडिएट टनेल ) पोर्टल : 394 मीटर लांबीचा एडीआयटी बोगदा 6 महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. यामुळे शिळफाटा व्यतिरिक्त खोदकामासाठी दोन अतिरिक्त एनएटीएम फेसची सोय झाली आहे. या अतिरिक्त प्रवेशामुळे 700 मीटरहून अधिक भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.