आता इंटरनेटशिवाय करता येणार UPI पेमेंट; ‘अशी’ आहे प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंटसाठी UPI (Unified Payments Interface) सारखी सुविधेद्वारे तुम्हाला घरबसल्या सहजपणे पैसे ट्रान्सफर करता येते. यासाठी तुम्हाला फक्त पेटीएम, फोनपे, भीम, गुगल पे इत्यादी UPI सपोर्टिंग अ‍ॅप्सची गरज आहे. UPI पेमेंटसाठी इंटरनेटची आवश्यकता असते. मात्र, ज्या लोकांकडे इंटरनेट आणि स्मार्टफोन नाही ते देखील UPI ट्रान्सझॅक्शन करू शकतात. इंटरनेट नसल्यास, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची म्हणजेच NPCI ची *99# सुविधा खूप उपयुक्त ठरणार आहे.

*99# ही NPCI ची USSD बेस्ड मोबाइल बँकिंग सर्व्हिस आहे, जी नोव्हेंबर 2012 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला ही सर्व्हिस फक्त BSNL आणि MTNL युझर्ससाठी उपलब्ध होती. आता *99# द्वारे UPI पेमेंट करण्यासाठी, तुमचा फोन नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय, त्याच फोन नंबरवरून भीम अ‍ॅपवर एकदाच रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

इंटरनेटशिवाय UPI द्वारे पैसे कसे ट्रान्सफर करावे ?
स्टेप 1- सर्वप्रथम फोनचा डायल पॅड उघडा आणि *99# टाइप केल्यानंतर कॉल बटणावर टॅप करा. हे तुम्हाला 7 पर्याय असलेल्या नवीन मेनूवर घेऊन जाईल. या मेनूमध्ये Send Money, Receive Money, Check Balance, My Profile, Pending Requests, Transactions आणि UPI PIN यांसारख्या पर्यायांची लिस्ट असेल.

स्टेप 2- जर तुम्हाला फक्त पैसे पाठवायचे असतील तर डायल पॅडवर नंबर 1 दाबून Send Money पर्याय निवडा. यानंतर, तुम्ही फोन नंबर, UPI आयडी किंवा अकाउंट नंबर आणि IFSC कोड वापरून पैसे पाठवू शकाल.

स्टेप 3- नंतर रक्कम एंटर करा आणि ट्रान्सझॅक्शन पूर्ण करण्यासाठी तुमचा 4 किंवा 6 अंकी UPI पिन एंटर करा. मग तुम्हाला फक्त ‘Send’ वर टॅप करायचा आहे.

UPI म्हणजे काय ?
UPI ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी मोबाईल अ‍ॅपद्वारे बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते. UPI द्वारे, तुम्ही एक बँक खाते एकापेक्षा UPI अ‍ॅप्सशी लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI अ‍ॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात. विशेष बाब म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी अशी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू देते.

Leave a Comment