श्रीलंका क्रिकेटला मोठा धक्का!! उपुल थरंगासह 15 खेळाडू देश सोडून अमेरिकेकडून खेळणार क्रिकेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | क्रिकेट या खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीलंकेला आणि श्रीलंका क्रिकेटला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. श्रीलंका क्रिकेट संघाच्या जवळपास 15 खेळाडूंनी देश सोडून दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्याचा विचार केला आहे. यामुळे श्रीलंकेत एकच खळबळ उडाली आहे.

श्रीलंकेतील ‘ द मॉर्निंग ’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या देशात योग्य संधी मिळन नसल्यानं आणि आर्थिकदृष्ट्या चांगली साथ मिळाल्यामुळे हे खेळाडू निराश झाले आहेत. मागील महिन्यात अष्टपैलू शेहान जयसूर्यानं अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि आता अन्य खेळाडूही हाच पर्याय निवडण्याच्या विचारात आहेत.

उपुल थरंगासह 15 खेळाडू अमेरिकेला जाणार

रिपोर्टनुसार, श्रीलंकेचा धडाकेबाज ओपनर उपुल थरंगा, जलदगती गोलंदाज दुष्यंत चमीरा , अमिला अपोंसो, दिलशान मुनवीरा, लाहिरु मधुयशनका, मनोज सरतचंद्रा आणि निशान जेरीस यांसारख्या खेळाडूंनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहै. हे खेळाडू मार्चपर्यंत आपला देश सोडून अमेरिकेला रवाना होतील.

काही खेळाडूंच्या म्हणण्यानुसार, ” क्रिकेट मंडळाने नुकताच पैसे कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे  आमच्या करारामध्ये (द्वितीय दर्जाचे खेळाडू) वाढ न करण्याचा निर्णय घेतला. म्हणून अनेक खेळाडू निघून जाण्याचा विचार करीत आहेत.” अमिरेकेला जाण्याचा निर्णय घेणाऱ्या एका खेळाडूने दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो, श्रीलंकेत चांगलं भविष्य नाही. यासाठी आम्ही खेळाडूंनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय. घेतला आहे. जगातील विविध देशांच्या क्रिकेटपटूंना एकत्रित करुन जगाला चांगलं क्रिकेट देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’