दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस
माण तालुक्यातील उकिर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका उर्मिला सतीश मदने यांना पंचायत समिती माण यांच्या तर्फे सन 2018/19 च्या आदर्श शिक्षक पुरस्काराने दहिवडी येथे गौरविण्यात आले. शैक्षणिक कार्यात निरनिराळे उपक्रम त्यांच्या शाळेत राबवून शाळेचा वेगळा ठसा माण तालुक्यात ठेवला आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार महादेवराव जानकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उर्मिला मदने यांनी आतापर्यंत शिंदी बुद्रुक, महिमानगड, मार्डी उकिर्डे या गावच्या शाळांत सेवा दिली आहे. शिंदी बुद्रुक शाळेतील त्यांचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले आहेत. तसेच महिमानगड शाळेला त्यांनी “आयएसओ” मानाकंन मिळवून दिले आहे. त्यांचे विद्यार्थी विविध शालेय स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. तालुकास्तरीय हस्तलिखित स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकांचे यश संपादन केलेले आहे. कोरोना काळात उर्किडे शाळेत ‘घरोघरी शाळा ‘ हा उपक्रम राबविला आहे.
यावेळी यावेळी जिल्हा परिषद शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, प्रभाकर देशमुख , पंचायत समिती सभापती लतिकाताई विरकर , उपसभापती नितीन राजगे, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा देसाई जिल्हा प सदस्य अरुण गोरे, पंचायत समिती सदस्या अपर्णा भोसले ,गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सौ सोनाली विभूते, व शिक्षक मोठ्या संख्येने हे उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल बिदाल ग्रामस्थांतर्फेही सत्कार करण्यात आला.