भारतानंतर अमेरिकेनेही घातली TikTok वर बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वॉशिंग्टन । भारतानंतर अमेरिकेतही TikTok वर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शुक्रवारी सांगितले की सुरक्षेचा धोका लक्षात घेता आम्ही TikTok बंदी घालत आहोत. एअरफोर्स वनवर (Air Force One) पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘जिथपर्यंत TikTok चा प्रश्न आहे, आम्ही त्यावर बंदी घालतोय’. भारताने केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेत चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. TikTokवर हेरगिरी आणि डेटा चोरीचा आरोप होत असतांना अमेरिकेनेही TikTok बंदी घातली आहे.

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते, आम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही TikTok वर बंदी घालू शकतो, तसेच आम्ही इतर काही पर्यायांवर विचार करीत आहोत. परंतु तो कोणत्या पर्यायांविषयी बोलत आहे हे त्यांनी स्पष्ट केले नाही. दरम्यान लडाख हिंसाचारानंतर भारताने कारवाई करताना TikTok सह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. तेव्हापासून अमेरिकेत TikTokवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली होती. अमेरिका TikTokला राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे मानत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ अनेक नेत्यांनी या बंदीबद्दल बोलले होते.

चौफेर टिकेनंतर TikTok आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध करण्याचा काम करत आहे. आपण चीनसाठी हेरगिरी करीत नाही. अलीकडेच, TikTok चे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर म्हणाले की, TikTok पारदर्शकतेसाठी वचनबद्ध आहे. आमचा राजकीय संबंध नाही. आम्ही राजकीय जाहिरात स्वीकारत नाही आणि कोणताही अजेंडा नाही – आमचे एकमेव उद्दिष्ट आहे की सर्वांनी आनंद घेण्यासाठी एक ज्वलंत, गतिमान व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. आज TikTok हे सर्वात मोठे लक्ष्य ठरले आहे, परंतु मला हे स्पष्ट करायचे आहे की, आम्ही कोणाचेही शत्रू नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment