खरंच..! हे औषध ठरणार अमेरिकेसाठी वरदान ??? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजलेला आहे.त्यामुळे अमेरिकेचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. या विषाणूमुळे आतापर्यँत अमेरिकेत ६ लाख ७० हजाराहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे,तर मृतांचा आकडा हा ३४ हजारांच्या पुढे गेला आहे.जगभरातील सर्वाधिक संक्रमित रूग्ण हे अमेरिकेतच आहेत आणि सर्वाधिक मृत्यूही येथेच झाले आहेत.अशा परिस्थितीतच अमेरिकेमध्ये एक औषधाने आशा निर्माण केली आहे आणि त्या औषधाचे नाव आहे Remdesivir .

दाव्यानुसार, इबोलाच्या निर्मूलनासाठी तयार करण्यात आलेले हे अँटी व्हायरल औषध रॅम्डेसिव्हिरच्या वापराचे चमत्कारिक परिणाम दिसून आले आहेत. एसटीएटी नावाच्या संकेतस्थळाने शिकागो विद्यापीठाच्या साथीच्या रोगाचा अभ्यासक कॅथलिन मलेनचा हवाला देत म्हटले आहे की तेथे दाखल झालेल्या १२५ जणांपैकी १२३ लोकांना औषधोपचार म्हणून Remdesivir वापरल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्याने सांगितले की यापैकी ११३ लोक हे गंभीररित्या आजारी होते . असे म्हणतात की हे औषध वापरल्यानंतर रूग्ण खूप वेगाने बरे होत आहेत. शिकागो विद्यापीठाच्या प्राध्यापकांशी चर्चेदरम्यान कॅथलिन यांनी या गोष्टी सांगितल्या.

Hopeful" Results Using Antiviral Drug Remdesivir to Treat COVID-19

अद्याप औषधाच्या परिणामाबद्दल स्पष्टता नाही
औषधाच्या परिणामाबद्दल असे म्हटले जात आहे की कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण हे औषध वापरल्यानंतर वेगाने बरे होत आहेत,परंतु अजूनही त्याच्या परिणामाबद्दल फारसे काही माहिती नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार,सध्या या औषधाच्या दुष्परिणामांची तपासणी बर्‍याच संस्थांमध्ये केली जात आहे, आणि निश्चितच त्यांना बरीच आशा आहे.हे औषध तयार करणार्‍या गिलियड सायन्सेस या कंपनीने सांगितले की या टप्प्यावर आपण असे म्हणू शकतो की एप्रिल महिन्यात कोणत्याही वेळी या औषधाच्या दुष्परिणामांची माहिती जाहीर केली जाऊ शकते.

‘एकाच दिवसात रुग्णांना व्हेंटिलेटरमधून काढले’
शिकागो विद्यापीठातील एपिडेमिओलॉजिस्ट मलेन यांनी देखील सांगितले की हे औषध वापरल्यानंतर त्याच दिवशी बरेच रुग्ण व्हेंटिलेटरमधून बाहेर आले. ते म्हणाले की एकूणच काय कि आमच्या रूग्णांवर या औषधाचा चांगला परिणाम दिसून आला आहे.आमच्यातील बहुतेक रुग्णांची प्रकृती खूपच गंभीर होती पण त्यातील बहुतेक लोकं हे ६ दिवसात सुधारले. एकंदरीत,या साथीच्या आजाराने ग्रासलेल्या या देशासाठी Remdesivir ने एक नवी आशा जागवली आहे.

NIH begins clinical trial of remdesivir in search for coronavirus ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

भारतीय लष्करातील ८ जणांना करोनाची लागण- लष्कर प्रमुख मनोज नरवणे

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर, दिवसभरात २८६ नवे रुग्ण

सरकारकडून टाळेबंदीत शिथिलता? ‘या’ क्षेत्रांनाही मिळणार सूट, पहा यादी

२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment