ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा प्रमुख अयमान अल-जवाहिरी (ayman al zawahiri) ठार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही माहिती दिली आहे. 2011 मध्ये ओसामा बिन लादेनच्या खात्मानंतर दहशतवादाविरुद्धच्या युद्धात हे मोठे यश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सोमवारी जवाहिरीच्या (ayman al zawahiri) मृत्यूची माहिती दिली. या दहशतवाद्यावर 25 मिलियन डॉलर इनाम होता. 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या हल्ल्यात त्याचा हात होता. या हल्ल्यामध्ये सुमारे 3000 लोकांचा मृत्यू झाला होता.

तसेच या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांना मोठा झटका बसला आहे. अल जवाहिरीवर (ayman al zawahiri) अमेरिकेने 25 मिलियन डॉलरचं बक्षिस ठेवलं होतं. इजिप्तच्या इस्लामिक जिहाद दहशतवादी गटाची स्थापना करण्यात मदत करणारे नेत्रचिकित्सक जवाहिरीने (ayman al zawahiri) मे 2011 मध्ये लादेनला अमेरिकन सैन्याने मारल्यानंतर अल-कायदाचे नेतृत्व हाती घेतले. याआधी, जवाहिरीला (ayman al zawahiri) अनेकदा बिन लादेनचा उजवा हात आणि अल-कायदाचा मुख्य विचारवंत म्हटले जायचे.

जवाहिरी (ayman al zawahiri) हा अमेरिकेच्या ‘मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट’पैकी एक होता. ड्रोनने दोन क्षेपणास्त्रे डागली तेव्हा जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीत होता. ते म्हणाले की, कुटुंबातील इतर सदस्य घटनास्थळी उपस्थित होते, परंतु त्यांना कोणतीही इजा झाली नाही आणि फक्त जवाहिरी मारला गेला. 1980 च्या दशकात तुरुंगात असलेल्या जवाहिरीने (ayman al zawahiri) त्याच्या सुटकेनंतर देश सोडला आणि हिंसक आंतरराष्ट्रीय जिहादी चळवळींमध्ये सामील झाला. अखेर तो अफगाणिस्तानात स्थायिक झाला, यावेळी तो ओसामा बिन लादेनबरोबर दहशतवादी संघटनेत सामील झाला. त्यांनी एकत्रितपणे अमेरिकेविरुद्ध युद्ध घोषित केले आणि 11 सप्टेंबर 2001 रोजी हल्ला केला होता.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर