वॉशिंग्टन । संपूर्ण जगासह अमेरिकेत कोरोनाने सर्वाधिक थैमान घातले आहे. अमेरिकेत कोरोनाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याच वेळेस नागरिकही बेजबाबदारपणे वागत असल्याच्या घटना समोर येत आहे. अमेरिकेते असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका प्रवाशाचा विमान प्रवासातच मृत्यू झाला. या प्रवाशाला करोना असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
ओर्लांडो, फ्लोरिडाहून लॉस एंजलिसला जाणाऱ्या विमानात एक ६९ वर्षीय प्रवासी बसला होता. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळेतच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. शरीर थरथरत होते, त्याशिवाय श्वास घेण्यासही त्रास जाणवत होता. न्यू ओरलियन्समध्ये विमानाचे आपात्कालीन लँडिंग करण्यात आले. तेथून या व्यक्तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी या प्रवाशाला मृत घोषित केले.
एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रवाशाला करोनासदृष्य लक्षणे दिसून आली होती. यामध्ये चव न कळणे , वास न येणे आदी लक्षणे दिसली असल्याचे त्याच्या पत्नीने माहिती दिली असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. विमानात प्रकृती ढासळल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. मात्र, त्याच वेळी या व्यक्तिची करोना चाचणी होणार असल्याचे सांगितले होते. अखेर जवळपास आठवडाभराने अहवाल आल्यानंतर या व्यक्तिला करोनाची चाचणी असल्याचे समोर आले.
अमेरिकन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आता या विमानातील प्रवाशांची माहिती घेणे सुरू केले आहे. त्याशिवाय विमानातील कर्मचाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याचे समजते. अमेरिकेतील नियमांनुसार, विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी करोनाची बाधा झाली असल्यास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय, मागील १४ दिवसांमध्ये करोनासारखी लक्षणे आढळली का, याचीही माहिती सांगणे आवश्यक आहे. या व्यक्तीने करोनाचाी बाधा अथवा लक्षणे दिसली नसल्याचे म्हटले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’