जगविख्यात बाईक कंपनी ‘हार्ले डेव्हिडसन’ भारतातून आपला गाशा गुंडाळणार

नवी दिल्ली । भारतातील हार्ले डेव्हिडसन बाईक प्रेमींसाठी ही वाईट बातमी. जगविख्यात अमेरिकन बाईक कंपनी हार्ले डेव्हिडसनने, भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याची गुरुवारी घोषणा केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत हार्ले डेव्हिडसन हरियाणा राज्यातील बावळ येथील आपला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद करत आहे. याशिवाय गुडगावमध्ये असणाऱ्या विक्री कार्यालयात मोठी घट करण्याची कंपनीची योजना असल्याचं या दुचाकी उत्पादक कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

हार्ले डेव्हिडसनकडून सांगण्यात आलं की, कंपनीच्या डीलर नेटवर्क कॉन्ट्रॅक्ट कालावधीद्वारे ग्राहकांसाठी सेवा सुरु राहणार आहे. तसंच कंपनी आपलं व्यवसाय मॉडेल बदलत आहे आणि आपल्या ग्राहकांना सेवा देत राहण्याच्या पर्यायांचं मूल्यांकन करत आहे. देशातील आपला व्यवसाय चालवण्यासाठी भागीदाराशी करार करण्याच्या विचारात असल्याची माहिती उद्योग सुत्रांनी दिली आहे. कं

पनीच्या या निर्णयामुळे जवळपास 70 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर 2020 ते पुढील 12 महिन्यांमध्ये पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ऑफरोडिंगसाठी हार्ले डेव्हिडसन बाईक्सना बाईक शौकिनांची पसंती असते. जगभरातील तरुणाईमध्ये या बाईकची क्रेझ आहे. त्यामुळे हार्ले डेव्हिडसन कंपनी भारतातून जाणे भारतातील बाईक प्रेमींसाठी वाईट बातमी ठरु शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.