जॉर्ज फ्लॉयडनंतर अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात आणखी एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू; पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील अटलांटा येथे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका कृष्णवंशीय माणसाला एका पोलिस कर्मचाऱ्याने गोळ्या घालून ठार मारले. या घटनेच्या काही तासांनी अटलांटा पोलिस प्रमुखांनी आपला राजीनामा दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, त्या व्यक्तीने एका पोलिस अधिकाऱ्यांची टेझर बंदूक हिसकावली आणि तो पळून जात असताना त्याला गोळी घातली गेली. अटलांटामध्ये दारू पिऊन गाडी चालवत असताना पकडला गेलेल्या २७ वर्षीय रेशर्ड ब्रूक्स नावाच्या एका काळ्या माणसाचा पोलिसांच्या गोळ्या लागून मृत्यू झाला. यानंतर अटलांटामध्ये विरोध प्रदर्शन केले गेले. या घटनेनंतर अटलांटाच्या पोलिस प्रमुख एरिका शिल्ड्स यांनी लगेचच आपला राजीनामा दिला आहे.

Rayshard Brooks

जॉर्जिया ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (जीबीआय) चे संचालक विक रेनोल्ड्स म्हणाले की,” ही घटना शुक्रवारी रात्री एका व्हेन्डी रेस्टॉरंटबाहेर घडली. CCTV कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींच्या मोबाइल फोनमध्ये ही घटना कैद केली गेली.” रेनॉल्ड्स पत्रकार परिषदेत म्हणाले कि, “ जेव्हा एखादा अधिकारी प्राणघातक अशी काहीशी कृती करत असतो, तेव्हा अशा परिस्थितीत काय घडले हे जाणून घेण्याचा सामान्य जनतेला अधिकार असतो.” यावेळी आंदोलकांनी रेस्टॉरंटला आणि जवळच्या महामार्गावर आग लावून वाहतुकीस व्यत्यय आणला. अटलांटाचे महापौर कीशा लान्स बॉटम्स यांनी शनिवारी दुपारी पोलिस प्रमुखांच्या राजीनाम्याची घोषणा केली.

ब्रुक्सवर गोळ्या झाडणाऱ्या त्या अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करण्याचे आवाहनही महापौरांनी यावेळी केले. ते म्हणाले की,” शिल्ड्स यांनी स्वत:हून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.;’ जीबीआयने सांगितले आहे की, अटलांटा पोलिसांना अशी तक्रार मिळाली होती की, कारमध्ये झोपलेल्या एका व्यक्तीने रेस्टॉरंटच्या बाहेरचा रस्ता रोखून धरला आहे, त्यानंतर पोलिस तिथे दाखल झाले. त्यावेळी ब्रुक्स आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. जीबीआयने सांगितले की, घटनेच्या वेळी ब्रूक्स हा दारू पिऊन नशेत असल्याचे पोलिसांना आढळले तसेच तो पोलिसांपासून अटक होण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्नही करत होता. शनिवारी जीबीआयने सदर घटनेचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

अटलांटामधील ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा २५ मे रोजी मिनियापोलिस येथे पोलिस कोठडीत एका आफ्रिकन-अमेरिकन नागरिक असलेल्या जॉर्ज फ्लॉयड याचा मृत्यू झाला. फ्लॉयडच्या मृत्यूनंतर संपूर्ण अमेरिकेत पोलिसांचे क्रौर्य आणि वांशिक भेदभावाविरूद्ध निषेध नोंदविण्यात येत आहेत. रेनॉल्ड्सच्या म्हणण्यानुसार झालेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की, घटनेवेळी दोन अधिकाऱ्यांनी ब्रूक्सला अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्याने एका अधिकाऱ्याची टेझर बंदूक हिसकावून घेतली तसेच पळून जात असताना त्याने त्या टेझर बंदूकिने एका पोलीस अधिकाऱ्यावर गोळी देखील झाडली, त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याने त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. ब्रूक्सचा नातेवाईक क्रिस्टल ब्रुक्स म्हणाला, “तो कोणालाही इजा पोहोचवित नव्हता.”

पोलिस त्याच्या गाडीकडे गेले आणि कार उभी असतानाही त्यांनी त्याला गाडीबाहेर खेचले आणि त्याच्याबरोबर भांडण सुरू केले. त्याने बंदूक हिसकावली, मात्र त्याने बंदूक फक्त पकडून ठ्वली होती आणि तो पळून जात होता.” घटनेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना तुरूंगात पाठवावे, अशी मागणी क्रिस्टल यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment