अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांचा पगार किती आहे? जाणुन घ्या त्यांना मिळणार्‍या खास सुविधांबाबत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जो बाईडन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती म्हणून 30 जानेवारी रोजी शपथ घेतली. अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली आहे. अमेरिकेचा जागतिक राजकारणामध्ये मोठा दबदबा पूर्वीपासूनच राहिलेला आहे. म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मोठी किंमत जागतिक राजकारणामध्ये असते.

अमेरिकेचा राष्ट्रपती हा जगातील सर्वात शक्तिमान समजल्या जाणाऱ्या व्यक्तींपैकी एक समजला जातो. अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे वेतन आणि वेगवेगळ्या सुविधा सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. जाणून घेऊ अमेरिकेच्या राष्ट्रपतींचे मासिक वेतन आणि इतर मुख्य सुविधांबाबत,

  • अमेरिकेच्या राष्ट्रपतींना वार्षिक चार लाख डॉलर (2.9 कोटी रुपये) वार्षिक पगार दिला जातो.

  • 50 हजार डॉलरचे (चाळीस लाखांचे) भत्ते दिले जातात.

  • 1लाख डॉलर (ऐंशी लाख) प्रवास भत्ते दिले जातात.

  • राहण्यासाठी मोठे आकर्षक असे व्हाईट हाऊस राष्ट्रपतींच्या दिमतीला असते.

  • हवाई प्रवासासाठी बोईंग 747 विमान विशेष सुविधांसह दिले जाते. यामध्ये 4 हजार स्क्वेअर फूट जागा वापरण्यासाठी मिळते.

  • बुलेट आणि बम प्रुफ कार दिली जाते. अश्या आणि अनेक सुविधा राष्ट्रपतींना दिल्या जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment