Sunday, March 26, 2023

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी वापरा बदामतेल; जाणून घ्या त्याचे आणखी फायदे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बदामामुळे चेहऱ्यावरील सौंदर्य टिकून राहण्यात मदत मिळते. एवढ्याशा बदामामध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे. बदामाप्रमाणेच यापासून तयार केल्या येणाऱ्या तेलामुळे चेहऱ्याचा रंग आणि पोत चांगला राहण्यात मदत मिळते. बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, झिंक, लोह, मॅगनिझ, फॉस्फोरस आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हे घटक भरपूर प्रमाणात आहेत. हे सर्व घटक त्वचा आणि केसांसाठी पोषक आहेत. पण यासाठी बदामाचे शुद्ध तेल वापरावे. तसंच आहारामध्येही बदामाचा समावेश करावा.

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल लावावे आणि हलक्या हातानं मसाज करावा. तेल जास्त प्रमाणात घेऊ नये. तेलाचे काही थेंब आपल्या हातांवर घ्या. हातांचे पंजे एकमेकांवर घासा आणि संपूर्ण चेहऱ्यावर बदामाचे तेल लावा. आता गोलाकार दिशेनं चेहऱ्याचा हलक्या हातानं मसाज करा. नियमित हा उपाय केल्यास चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येईल. महत्त्वाचे म्हणजे हे तेल सर्व प्रकारच्या त्वचेसाठी वापरले जाऊ शकते. बदामाच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, जे अँटी-ऑक्सिडेंटच्या स्वरुपात काम करते. याचा उपयोग केल्यानं चेहरा नितळ होतो.

- Advertisement -

अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ तयार होतात. ही समस्या दूर करण्यासाठी मध आणि बदामाचे तेल एकत्र घ्या. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या डोळ्यांचा या मिश्रणाने मसाज करा. तुम्हाला हवे तुम्ही गुलाब जलही वापर करू शकता. काही दिवस सलग या मिश्रणाने डोळ्यांचा मसाज करा. वाढत्या वयोमानानुसार आपल्या शरीराप्रमाणे चेहऱ्यावरही कित्येक बदल दिसून येतात. चेहरा आणि मानेवर सुरकुत्या दिसू लागतात. सुरकुत्या कमी करण्यासाठी बदामाचे तेल हा रामबाण उपाय आहे. एका वाटीमध्ये बदाम तेल, नारळ तेल आणि कोरफड जेल एकत्र घ्या आणि या मिश्रणाने चेहऱ्याचा मसाज करा. या उपायामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि सुरकुत्या देखील कमी होतील.

तुम्हाला चेहऱ्यावरील तेज कायम टिकवून ठेवायचं असेल तर मेक अप काढताना केमिकल युक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी बदामाचे तेल वापरा. कापसावर बदामाचे तेल घ्या आणि मेक अप काढा. यामुळे मेक अपही निघेल आणि त्वचा देखील चमकेल. शिवाय बदाम तेलामुळे चेहऱ्याला पोषण तत्त्वांचा पुरवठाही होईल चेहऱ्यावर मुरुम असल्यास आपल्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण येते. मुरुमांची समस्या असणाऱ्य तरुण-तरुणींनी बदाम तेलाचा वापर करावा. या तेलामध्ये अँटी ऑक्सिडेंटचा साठा आहे. ज्यामुळे त्वचेवरील बॅक्‍टेरियांचा खात्म होतो. बदाम तेलामुळे चेहऱ्यावरील रोमछिद्रे स्वच्छ होतात. त्वचे प्रमाणेच हे तेल केसांसाठीही पोषक आहे. या तेलामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ईचा साठा आहे. बदामाच्या तेलानं केस आणि केसांच्या मुळांचा मसाज करा. यामुळे केस मजबूत, चमकदार आणि जाड होतील. केसातील कोंडा देखील कमी होईल.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in