राज्यात सरकारी कामांसाठी मराठी भाषा वापरा, अन्यथा पगार वाढ होणार नाही 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आल्यापासून पुन्हा एकदा मराठीचा ध्यास सुरु झाला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे मराठीचा वापर करण्यास सांगितले आहे. हा विभाग खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे त्यामुळे मराठी माणूस या विचारधारेचा प्रसार करणारी शिवसेना यापाठीमागे आहे असे म्हंटले जात आहे. राज्य सरकारच्या या सर्क्युलर मध्ये सर्व सरकारी कार्यालये, मंत्रालय, विभागीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांच्या वापरासाठी लिहिल्या जाणाऱ्या पत्रांमध्ये तसेच इतर गोष्टींमध्ये केवळ मराठी भाषेचा वापर करावा असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. असे न केल्यास कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या जातील किंवा कॉन्फिडेन्शियल अहवालात त्यांची नोंद केली जाईल. अथवा एक वर्षासाठी त्यांची पगारवाढ थांबवली जाईल असे सांगण्यात आले आहे.

याआधी देखील असा आदेश जारी करण्यात आला होता. आताच्या सर्क्युलर मध्ये असे सांगण्यात आले आहे की, या प्रकरणात दोषी आढळलेल्या लोकांना केवळ मराठी न वापरण्यामागे काही ठोस कारण असेल तरच सूट दिली जाईल असे सांगण्यात आले आहे. या सर्क्युलर मध्ये काही सरकारी योजना आणि जाहिराती हिंदी आणि इंग्रजी मध्ये लिहिण्यासंदर्भात सांगितले असून याआधीही असा अध्यादेश काढला होता मात्र त्याचे पालन केले गेले नसल्याचे सांगितले आहे.

कॅबिनेट मिटींगच्या वेळी हा मुद्दा काढण्यात आला होता. आणि सर्व अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली होती की संबंधित विभागांमध्ये याचे पालन केले जावे. माजी प्रमुख सचिव महेश जागडे यांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हंटले आहे, “जर तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात तर मराठीचा प्रसार केला पाहिजे. पूर्वीच्या सरकारने याबाबत सूचना केल्या होत्या मात्र काही फरक पडला नाही आता या सरकारने हा मुद्दा गंभीररीत्या घेतल्याचे दिसून येते आहे.”  तर आता महाराष्ट्रात मराठी सक्तीची होईल असे चित्र दिसून येते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment