स्कुटी साफ करण्यासाठी तिरंग्याचा वापर; पोलिसांनी घेतले ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या तिरंगाचा वापर गाडी साफ करण्यासाठी केल्याच्या आरोपाखाली एका 52 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. सदर घटना ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागातील आहे. तसेच हा व्यक्ती उत्तर घोंडा भागातील रहिवासी असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

याबाबतचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हा व्यक्ती तिरंगा च्या साहाय्याने आपल्या पांढऱ्या स्कूटरला साफ करत आहे. आणि त्यावर धूळ उडवत आहे.

https://twitter.com/hem_men1/status/1567460779200217088?s=20&t=68L1kY4_xbrTbdd9pBYDUg

याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा १९७१ च्या कलम २ अन्वये भजनपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्या व्यक्तीची गाडी आणि त्याचा झेंडाही जप्त करण्यात आला आहे.