गर्लफ्रेंडला घरी जाऊन अन् मित्राला वर्गात जाऊन घातल्या गोळ्या! उत्तरप्रदेश पुन्हा एकदा हादरले!

उत्तर प्रदेश | प्रेमाचे त्रिकुट असेल तर अनेक ठिकाणी नाती बिघडलेली ऐकायला मिळतात. त्यातून कायमचे नाते बिघडते तर, कधी कधी काही विपरीत घडते. अनेकदा हे सर्व गैरसमजातून होत असते. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील झासीमध्ये घडला आहे. येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणाऱ्या एका तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला आणि मित्राला गोळ्या घातल्या आहेत. या हल्ल्यामध्ये गर्लफ्रेंडचा मृत्यू झाला असून त्याचा मित्राची अवस्था चिंताजनक आहे.

झासीमधील एका स्थानिक महाविद्यालयामध्ये मंथन सिंह सेगर हा मानसशास्त्र विषयामध्ये एमए करतो आहे. सोबतच त्याची गर्लफ्रेंड कृतीका त्रिवेदी आणि मित्र हुकुमेंद्र सिंह गुर्जर हे दिखील त्याच्याच वर्गात शिकत होते. तिघांची एकमेकांशी घनिष्ट मैत्री होती. पण मंथन सिंह याला कृतिका आणि हुकुमेंद्र यांच्या मैत्रीवर शंका आली आणि त्याने दोघांना संपवण्याचे ठरवले. दोघांना संपवण्याचे ठरवून तो बंदूक घेऊन सकाळी तो क्लासमध्ये आला. त्याने हुकुमेद्रला डोक्यात गोळ्या घातल्या. आणि नंतर फळ्यावर, ‘हुकुमेद्र संपला’ असे लिहले. त्यानंतर तो कृतिकाला शोधू लागला. क्लासमध्ये ती नव्हती. त्यानंतर तो कृतिकाच्या घरी गेला. कृतीकाला एकापेक्षा जास्त गोळ्या घातल्या. कृतिकाच्या घरच्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी गोळ्याचा आवाज ऐकून, पळत येऊन आरोपीला पकडले. त्यानंतर कृतिकाला आणि हुकुमेद्रला रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर कृतिकाला मृत घोषित केले व हुकुमेद्रलाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

तिघेही 2016 पासून एकमेकांचे चांगले मित्र होते. व गेल्या काही दिवसापासून त्यांच्यामध्ये दोघांच्या प्रेमसंबंधांना घेऊन वाद सुरू असल्याचे, झासीचे एसएसपी दिनेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सोबतच त्यांनी, ‘आरोपी हा दोघांना मारण्याच्या मनिषेने आला होता. आणि दोघांना त्याने संपवले देखील. पोलिसांनी आरोपीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यार जप्त केले आहे’. अशीही माहिती दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’