देवदर्शनासाठी गेलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात! 26 भाविकांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कानपुर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये साद पोलीस स्टेशन परिसरात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली ताबा सुटल्यामुळे (tractor trolley overturned roadside) तलावात पडली. या दुर्घटनेत 26 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 30 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघाताची (tractor trolley overturned roadside) माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काल रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये 11 मुले आणि 11 महिलांसह 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
साध पोलीस स्टेशन हद्दीतील कोरथा गावातील भाविक ट्रॅक्टर-ट्रॉलीने फतेहपूर येथील चंद्रिका देवी मंदिरात गेले होते. ट्रॉलीमध्ये 50 हून अधिक लोक होते. परतत असताना साध ते गंभीरपूर गावादरम्यान रस्त्याच्या कडेला ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन (tractor trolley overturned roadside) तलावामध्ये पडली. दरम्यान तलावात पडलेल्या भाविकांना तब्बल एक तास बाहेर येता न आल्याने त्यांचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकानी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.

पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेप्रकरणी (tractor trolley overturned roadside) दुःख व्यक्त केले आहे. “कानपूरमधील ट्रॅक्टर-ट्रॉली दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होतील अशी अपेक्षा करतो. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!