धक्कादायक ! आई ओरडली म्हणून ‘तिने’ सोडले घर मग त्यानंतर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनेत सतत वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीने आई ओरडली म्हणून घर सोडले. यानंतर त्या मुलीला काही नराधमांनी वाटेत गाठून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हि घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.

हि घटना लखनऊच्या ग्रामीण भागातील इटौंजा भागात घडली आहे. यामध्ये १४ वर्षीय मुलीगी आई ओरडली म्हणून नाराज होऊन घराबाहेर पडली. तिने घरी परत येणार नाही, अशी आई-वडिलांना धमकी दिली. ती घरातून बाहेर पडल्यानंतर आईवडिलांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेच सापडली नाही. शेवटी मुलीच्या वडिलांनी इटौंजा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. मुलगी घरातून बाहेर पडल्यानंतर एक ई-रिक्षाचालक मुलीला भेटला. या इकरामुद्दीन असे होते. त्याने या मुलीची विचारपूस केली.

यानंतर मुलीने भूक लागल्याचे सांगितले तेव्हा त्या रिक्षाचालकाने आपल्याबरोबर चल असे सांगितले. तसेच तुझ्या राहण्याची आणि जेवणाचीदेखील व्यवस्था करतो असे त्या मुलीला सांगितले. त्यामुळे मुलगी त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाली. इकरामुद्दीनने मुलीला घरी नेल्यानंतर त्याच्या पाच मित्रांना फोन करुन घरी बोलावले. त्यानंतर ६ जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. आरोपीने जेवण घेऊन येण्याच्या बहाण्याने मित्रांना फोन केला होता. पोलिसांनी मुख्य आरोपी इकरामुद्दीन याच्यासह त्याचे मित्र शकील, उत्तम शर्मा, मोहम्मद नफीस, नूर मोहम्मद आणि रितेश यादव यांना अटक केली आहे.

You might also like